कृषी अधिकाऱ्यांची पीक पाहणी
By Admin | Updated: October 16, 2016 01:01 IST2016-10-16T01:01:08+5:302016-10-16T01:01:08+5:30
चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरातील धानपिकावरील रोगाची तालुका कृषी अधिकारी व्ही. ए. राजपूत यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कृषी अधिकाऱ्यांची पीक पाहणी
घोेट परिसराला भेट : कीटकनाशक फवारणीचा दिला सल्ला
चामोर्शी/घोट : चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरातील धानपिकावरील रोगाची तालुका कृषी अधिकारी व्ही. ए. राजपूत यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी ए. बी. उभे, कृषी परीवेक्षक पिल्लारे, राठोड, घोटचे कृषी सहायक पी. बी. पेंदाम, घोटचे सरपंच विनय बारसागडे, उपसरपंच साईनाथ नेवारे, भात गिरणीचे अध्यक्ष वसंत दुधबावरे, पवन दुधबावरे, बाबुराव भोवरे, पोलीस पाटील अविनाश वडेट्टीवार, हेमंत उपाध्ये, रवींद्र चलाख आदी उपस्थित होते.
घोट परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षांची भेट घेऊन पिकाची परिस्थिती कथन केली होती. त्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांना पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. पिकावर कीटकनाशकांची फवारणी करावी, असा सल्ला राजपूत यांनी दिला. (वार्ताहर)