मृतावस्थेत आढळला बडतर्फ कृषी अधिकारी

By Admin | Updated: May 24, 2015 02:14 IST2015-05-24T02:14:17+5:302015-05-24T02:14:17+5:30

येथील आयटीआय चौकानजीकच्या पंचवटीनगरात भाडयाच्या घरात राहणारा बडतर्फ कृषी अधिकारी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे.

Agricultural Officer was found in the dead | मृतावस्थेत आढळला बडतर्फ कृषी अधिकारी

मृतावस्थेत आढळला बडतर्फ कृषी अधिकारी

गडचिरोली : येथील आयटीआय चौकानजीकच्या पंचवटीनगरात भाडयाच्या घरात राहणारा बडतर्फ कृषी अधिकारी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. सचिन कृष्णराव नागदेवते (३८) असे मृतकाचे नाव आहे.
सचिन नागदेवते हा काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होता. पाच वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचा जळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी सचिन नागदेवतेवर पत्नीची हत्या केल्याचा आरोप होता. याप्रकरणी शिक्षा झाल्यामुळे प्रशासनाने त्याला सेवेतून बडतर्फ केले होते. तेव्हापासून तो पंचवटीनगरातील एका घरी भाड्याने राहत होता. दारुच्या आहारी गेल्याने त्याने दोन-तीन दिवसांपासून भोजन केले नव्हते. शनिवारी सकाळी तो आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Agricultural Officer was found in the dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.