कृषी केंद्राचे मालक बनले कृषी तज्ज्ञ
By Admin | Updated: October 27, 2014 22:35 IST2014-10-27T22:35:49+5:302014-10-27T22:35:49+5:30
मागील तीन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे धानपिकाला अनेक रोगांचां प्रादुर्भाव होत आहे. कृषी विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना औषध फवारणीबाबत

कृषी केंद्राचे मालक बनले कृषी तज्ज्ञ
वैरागड : मागील तीन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे धानपिकाला अनेक रोगांचां प्रादुर्भाव होत आहे. कृषी विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना औषध फवारणीबाबत मार्गदर्शन करीत नसले तरी अनेक कृषी केंद्रावरील मालकच कृषितज्ज्ञ बनून शेतकऱ्यांना औषध फवारणीचा सल्ला देत आहेत.
एका पंपाला दोन झाकण औषध वापरा, असे अनेक कृषी केंद्रधारकांकडून शेतकऱ्यांना सांगितले जात आहे.
जिल्हा कृषी विभागाकडून विविध योजनांची मोठी प्रसिद्धी झाली. पण रासायनिक खत अनेकांच्या बांधावर पोहोचला नाही. त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या योजनाही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या नाही.
रोवणीचे यंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचे वर्तमानपत्रातून दाखविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ झाला नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील धानपिकावर विविध रोगांचे सावट आहे.
मात्र कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सल्ला मिळत नाही. मात्र कृषी केंद्रधारकच कृषितज्ज्ञ बनून शेतकऱ्यांना सल्ला देत आहेत.
किडीचा प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी एका पंपाला दोन झाकण औषधी फवारा म्हणजे तुमच्या धानपिकावरील रोग लवकर नष्ट होईल, असा सल्ला ग्रामीण शेतकऱ्यांना दिला जात आहे. शेतकऱ्यांचाही कृषी केंद्रधारकांच्या सल्ल्याला प्रतिसाद आहे. (वार्ताहर)