विद्यापीठाने केले तांत्रिक संस्थांसोबत करार
By Admin | Updated: June 28, 2015 02:22 IST2015-06-28T02:22:42+5:302015-06-28T02:22:42+5:30
गोंडवाना विद्यापीठाने तांत्रिक विकासाच्या दृष्टीने व नवनवीन तंत्रज्ञानाचा लाभ दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी...

विद्यापीठाने केले तांत्रिक संस्थांसोबत करार
अनुतज्ज्ञांसह मान्यवरांची उपस्थिती : विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राला मिळणार नवी उभारी
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाने तांत्रिक विकासाच्या दृष्टीने व नवनवीन तंत्रज्ञानाचा लाभ दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र यापूर्वीच सुरू केले आहे. या केंद्रासाठी आयआयटी मुंबई, व्हीएनआयटी नागपूर आणि वन विभाग गडचिरोली यांच्यासोबत शुक्रवारी करार केलेत.
या सामंजस्य कराराच्या वेळी अनुतज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर, डॉ. सी. डी. मायी, कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, गडचिरोलीचे मुख्यवनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी, जामदार, डॉ. चौधरी, डॉ. सोवणी, डॉ. कोकोडे, डॉ. रोकडे आदी उपस्थित होते.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या सौजन्याने विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र अनुतज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा आढावा घेणे, त्यावर वैज्ञानिकरित्या विकसीत तंत्रज्ञानाचा आराधारावर प्रक्रिया करणे व त्यासाठी परिसरात मानव संसाधनाचा त्यांना प्रशिक्षीत करून उपयोग करून घेणे, अल्प कालावधीचे प्रशिक्षण व अभ्यासक्रम आयोजित करणे व या माध्यमातून रोजगार उपलब्ध करणे याकरिता हे केंद्र काम करते व त्या अंतर्गत कराकरबध्द झालेल्या संस्था काम करणारे आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अनिल काकोडकर होते. याप्रसंगी डॉ. प्रकाश डोळस आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार डॉ. एस. एम. रोकडे यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)