अनलाॅकनंतर भाजीपाला १० टक्क्यांनी महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST2021-06-22T04:24:48+5:302021-06-22T04:24:48+5:30
गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक असले तरी खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर रबी हंगामात अनेक शेतकरी भाजीपाल्याची ...

अनलाॅकनंतर भाजीपाला १० टक्क्यांनी महागला
गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक असले तरी खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर रबी हंगामात अनेक शेतकरी भाजीपाल्याची लागवड करतात. त्यामुळे उन्हाळभर भाजीपाल्याची आवक माेठ्या प्रमाणावर असते. याचा परिणाम दरही कमी व स्थिर असतात. परंतु पावसाळ्यात दर वाढतात. सध्या पावसामुळे बाहेरची आवक घटल्याने गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर १० टक्क्यांनी वाढले आहेत.
गडचिराेली येथे दरवर्षी उन्हाळ्यात स्थानिक शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. याशिवाय नागपूर व चंद्रपूरवरूनही भाजीपाला आणला जाताे. यावर्षीच्या उन्हाळ्यात कांदे व लसनाचे दर फारशे खाली घसरले नाही. पावसाळ्याची चाहूल लागताच दरवाढ झाली. सध्या कांदे ३० रुपये प्रति किलाे दराने विकले जात आहेत तर लसून ४० रुपये पाव दराने विकला जात आहे. पंधरवड्यापूर्वी कांदे २० ते २५ रुपये किलाे हाेते तर लसून ३० रुपये पाव प्रमाणे विकले जात हाेते. टमाटे, बटाटे, भेंडी, मिरची, फुलकाेबी, पत्ताकाेबी, कारले, वांगी, पालक आदी भाजीपाल्यांचे दर पंधरवड्यापूर्वी कमी हाेते. त्यानंतर आता या सर्वच भाजीपाल्याच्या किमतीत जवळपास १० ते १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. अनेक गृहिणी दरवाढीने त्रस्त झाल्या आहेत. आधीच काेराेनाचे संकट असताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत हाेता. त्यातच पुन्हा भाजीपाला पिकाची दरवाढ झाल्याने सर्वसामान्य तसेच शेतकरी कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. भाजीपाल्याचे दर पावसाळ्यापूर्वी एवढे वाढले आहेत तर भरपावसाळ्यात पुन्हा किती रुपयांनी दर वाढतील, याची चिंता नागरिकांना सतावत आहे.
बाॅक्स........
पुन्हा वरणावर जाेर
काेट ......
मागील वर्षीपासून खाद्यतेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. त्यानंतर उन्हाळ्यात कांद्याचे दर कमी हाेतील, अशी अपेक्षा हाेती. परंतु यावर्षी दर कमी झाले नाही. आता भाजीपाल्याचे दर वाढत आहेत.
- मीरा साेमणकर, गृहिणी
काेट .......
शहरी भागातील बाजारपेठेतून आणून ग्रामीण भागात अनेक विक्रेते भाजीपाल्याची विक्री करतात. त्यामुळे ते अधिक दराने विक्री करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आहारात दाेन्ही वेळेलाभाजीपाल्या वापर करणे शक्य नाही. सध्या दर वाढल्याने बेसन व वरणावर भर आहे.
- प्राची चाैधरी, गृहिणी
बाॅक्स .....
म्हणून वाढले दर
काेट .......
पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला निघणे बंद झाल्याने मुख्य बाजारपेठेतील आवक घटली. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले. १५ दिवसांपूर्वी प्रत्येक भाजीपाला १० ते १५ रुपयांनी प्रति किलाेवर स्वस्त हाेता. परंतु आता आवकच घटल्याने साहजिकच दर वाढणार हाेते. टमाटे, कांदे, लसून व अद्रकाचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
-पंकज लटारे, व्यापारी
काेट .....
ज्या शेतकऱ्यांनी शेतात भाजीपाल्याची लागवड केली हाेती. त्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामुळे भाजीपाला पीक नष्ट केले. तसेच रबी हंगामात व उन्हाळ्याच्या सुरुवातीला लागवड केलेल्या भाजीपाल्याची मुदत संपल्याने सध्या आवक घटली आहे.
- विनायक कुळमेथे, विक्रेता
बाॅक्स ....
भाजीपाला नसताना वाढतात दर
काेट .....
खरीप हंगाम संपल्यानंतर आम्ही आपल्या शेतात भाजीपाल्याची लागवड केली हाेती. परंतु या हंगामात बाजारपेठेत माेठ्या प्रमाणावर आवक हाेती. त्यामुळे नफा अत्यल्प मिळत हाेता.
- सुधाकर मडावी, शेतकरी
काेट ......
ज्यावेळी शेतकरी आपल्या शेतात उत्पादित केलेला माल विक्रीसाठी बाजारपेठेत नेताे तेव्हा त्याला अल्प किमतीत व्यापारी खरेदी करतात. त्यानंतर त्याच मालावर दुप्पट नफा कमवतात.
- हिराजी लाडवे, शेतकरी