तीन महिन्यानंतर पुन्हा कोरोनाने खाल्ली उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:49 IST2021-02-27T04:49:36+5:302021-02-27T04:49:36+5:30

जिल्ह्यात एकूण १०६ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. शुक्रवारी मृत पावलेली ७० वर्षीय महिला दुसऱ्या जिल्ह्यातील असून ती ...

After three months, Corona ate again | तीन महिन्यानंतर पुन्हा कोरोनाने खाल्ली उचल

तीन महिन्यानंतर पुन्हा कोरोनाने खाल्ली उचल

जिल्ह्यात एकूण १०६ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. शुक्रवारी मृत पावलेली ७० वर्षीय महिला दुसऱ्या जिल्ह्यातील असून ती उच्च रक्तदाबग्रस्त होती. नवीन २४ बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील २१ जणांचा समावेश आहे. याशिवाय अहेरी तालुक्यातील १, धानोरा तालुक्यातील १, कुरखेडा तालुक्यातील १ जणाचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ११ रूग्णांमध्ये गडचिरोलीमधील ९ आणि भामरागड तालुक्यातील २ जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील नवेगाव पेट्रोल पंप १, नवेगाव रोड १, तुलतुली कॉम्पलेक्स १, स्थानिक ३, शिवाजी हायस्कूल १, विवेकानंद नगर १, रेड्डी गोडाऊन चौक १, आशीर्वाद नगर १, पाटबंधारे विभाग १, कारमेर साईनगर १, हनुमान वार्ड १, राममंदिर १, माडेतुकूम १, जिल्हा परिषद ४, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली १, धानोरा तालुक्यातील स्थानिक १, कुरखेडा तालुक्यातील पुराडा १ आदींचा समावेश आहे.

Web Title: After three months, Corona ate again