अनेक वर्षांनंतर केवळ एका न.प. शिक्षकाना पदाेन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:41 IST2021-08-12T04:41:46+5:302021-08-12T04:41:46+5:30
गडचिराेली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या भाेंगळ कारभारामुळे शिक्षक संवर्गातील पदांचे राेस्टर अजूनही अद्ययावत करण्यात आले नाही. परिणामी शहराच्या न. ...

अनेक वर्षांनंतर केवळ एका न.प. शिक्षकाना पदाेन्नती
गडचिराेली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या भाेंगळ कारभारामुळे शिक्षक संवर्गातील पदांचे राेस्टर अजूनही अद्ययावत करण्यात आले नाही. परिणामी शहराच्या न. प. शाळांमधील अनेक सेवाज्येष्ठ शिक्षक पदाेन्नतीविनाच सेवानिवृत्त हाेत आहेत. दरम्यान, अनेक वर्षांनंतर येथील न. प. शाळेतील एका सहायक शिक्षकाला जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सेवाज्येष्ठतेचा विचार करून शिक्षण विस्तार अधिकारीपदावर पदाेन्नती दिली आहे. विशेष म्हणजे या शिक्षकाने गेली आठ-दहा वर्षे न. प. शाळेत केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकाची जबाबदारी सांभाळली आहे.
विसापूर येथील नगर परिषद शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख राधेश्याम भाेयर यांना जि. प. प्रशासनाच्या वतीने शिक्षण विस्तार अधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली असून, ते सिराेंचा पंचायत समितीमध्ये या पदावर रुजू झाले आहेत. राधेश्याम भाेयर यांच्या सेवेला ३७ वर्षे पूर्ण झाले आहेत. सन २०११ पासून ते प्रभारी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत हाेते. न. प. प्रशासनाकडे त्यांनी अनेकदा आपल्या सेवाज्येष्ठतेचा प्रश्न मांडून पदाेन्नतीचा मार्ग माेकळा करण्याची मागणी केली.
(बॉक्स)
प्रभारी मुख्याध्यापकांवर सुरू आहे कारभार
गडचिराेली नगर परिषदेमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी हे पद नाही. त्याऐवजी प्रशासकीय अधिकारी हे पद आहे. शासन नियमानुसार सदर पदावर शिक्षक भाेयर यांना सात ते आठ वर्षांपूर्वी पदाेन्नती देणे शक्य हाेते. मात्र न. प. शाळेतील शिक्षकांचे नगरपालिकेतील राेस्टर अद्यावत नसल्याने पदाेन्नतीचा प्रश्न थंडबस्त्यात आहे. येथील अनेक सेवाज्येष्ठ शिक्षक मूळ पदावरूनच सेवानिवृत्त झाले आहेत. सन १९९८-९९ पासून गडचिराेली न. प.मध्ये उच्चश्रेणी मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. न. प.च्या सर्वच दहा शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक व सहायक शिक्षकच कार्यरत आहेत. प्रभारी मुख्याध्यापकांवर शाळांचा कारभार सुरू आहे.
बाॅक्स...
नेहरू शाळेतर्फे झाला गाैरव
बऱ्याच वर्षानंतर शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदाेन्नती मिळालेल्या प्रभारी केंद्रप्रमुख राधेश्याम भाेयर यांचा रामनगर येथील जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक डिजिटल शाळेतर्फे शनिवारी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नवनियुक्त प्रभारी केंद्रप्रमुख सुधीर गाेहणे, मुख्याध्यापिका मंगला रामटेके, नयना चन्नावार, ज्याेती साळवे, माधुरी मस्के, संध्या चिलमवार आदी उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक जांभुळे यांनी केले, तर आभार महेंद्र शेडमाके यांनी मानले.