शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

५५७५ विद्यार्थी देणार आज नवोदयची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 05:00 IST

सदर परीक्षा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशान्वये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्या कक्षात शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांची सभा घेण्यात आली. या सभेमध्ये नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेत गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड चाचणी परीक्षा ११ ऑगस्टला सकाळी ११.३० ते  १.३० या वेळेत २२ परीक्षा केंद्रांवर होणार आहे. जिल्हाभरातील ५ हजार ५७५ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. सदर परीक्षा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशान्वये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्या कक्षात शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांची सभा घेण्यात आली. या सभेमध्ये नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेत गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. सभेला माध्यमिक शिक्षणाधिकारी आर. पी. निकम, प्राथमिक शिक्षणाधिकारी हेमलता परसा, उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे व सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.परीक्षा योग्यरीत्या पार पाडण्याकरिता जवाहर नवोदय विद्यालय घोट यांच्यामार्फत परीक्षा केंद्रांवर २२ केंद्र संचालक व जवाहर नवोदय विद्यालयातील २६ केंद्रीय पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. या परीक्षेत गैरप्रकार हाेत असल्याचा आराेप पालकांकडून झाल्यानंतर प्रशासनाने केंद्रावर करडी नजर ठेवली आहे.

२२ बैठी तर २२ भरारी पथकेसर्व परीक्षा केंद्रांवर पूर्णवेळ उपस्थित राहण्याकरिता २२ बैठी पथके व परीक्षा केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी २२ भरारी पथके तयार करून परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत नियोजन करण्यात आले. तसेच व्हीसीद्वारे प्रत्येक तालुक्यातील संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत निर्देश व परीक्षेबाबत मार्गदर्शन, तसेच कोविड-१९ चे सर्व नियम पाळून परीक्षा घेण्याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) फरेंद्र कुतीरकर यांनी मार्गदर्शन केले.

 

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा