दीर्घ प्रतीक्षेनंतर आरमोरीच्या रूग्णालयात सोनोग्राफी सेंटर सुरू

By Admin | Updated: November 17, 2016 02:03 IST2016-11-17T02:03:00+5:302016-11-17T02:03:00+5:30

येथील उपजिल्हा रूग्णालयात गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सोनोग्राफी सेंटर सुरू करण्यात आले.

After a long wait, Sonography Center started at Armory Hospital | दीर्घ प्रतीक्षेनंतर आरमोरीच्या रूग्णालयात सोनोग्राफी सेंटर सुरू

दीर्घ प्रतीक्षेनंतर आरमोरीच्या रूग्णालयात सोनोग्राफी सेंटर सुरू

आरमोरी : येथील उपजिल्हा रूग्णालयात गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सोनोग्राफी सेंटर सुरू करण्यात आले. या सोनोग्राफी सेंटरचे उद्घाटन व शुभारंभ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून परीविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी तथा आरमोरीचे प्रभारी पोलीस निरिक्षक डॉ. रणजित पाटील, रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद गवई, सोनोग्राफी तज्ज्ञ डॉ. शेंद्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत आखाडे आदी उपस्थित होते.
आरमोरी उपजिल्हा रूग्णालयात आरमोरी तालुक्यासह शेजारच्या तालुक्यातून तसेच चंद्रपूर जिल्ह्यातून विविध आजाराचे रूग्ण तपासणी व औषधोपचारासाठी मोठ्या संख्येने येतात. गरोदर मातांची तपासणी सुध्दा येथे केली जाते. मात्र सोनोग्राफीची सुविधा नसल्याने आजाराचे निदान होत नव्हते. सोनोग्राफीसाठी येथील रूग्णांना गडचिरोली व ब्रह्मपुरीला जावे लागत होते.
सातत्याने मागणी केल्यानंतर व वैद्यकीय अधीक्षक डॉ. गवई यांच्या पुढाकाराने आरमोरीच्या रूग्णालयात सोनोग्राफी सेंटर सुरू करण्यात आले आहे. याचा लाभ सर्वसामान्य, गरीब महिला रूग्ण यांना होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनची ही मागणी पूर्ण झाली आहे. यामुळे रूग्णांना दिलासा मिळाला आहे (वार्ताहर)

Web Title: After a long wait, Sonography Center started at Armory Hospital