आश्वासनानंतर एटापल्लीत उपोषणाची सांगता
By Admin | Updated: January 23, 2016 01:44 IST2016-01-23T01:44:20+5:302016-01-23T01:44:20+5:30
तुमरगुंडा येथील संदीप पोटामी या बालकाच्या मृत्यू प्रकरणात हलगर्जी वैद्यकीय अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, ....

आश्वासनानंतर एटापल्लीत उपोषणाची सांगता
एटापल्ली : तुमरगुंडा येथील संदीप पोटामी या बालकाच्या मृत्यू प्रकरणात हलगर्जी वैद्यकीय अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, यासह तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरावी, रूग्णवाहिका उपलब्ध करावी, यासह अन्य मागण्यांसाठी तालुका काँग्रेसच्या वतीने १८ जानेवारीपासून एटापल्ली येथे सुरू करण्यात आलेले उपोषण जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर शुक्रवारी मागे घेण्यात आले.
तुरमगुंडा येथील संदीप पोटामी याच्या मृत्यू प्रकरणातील दोषी डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करावी, यासह विविध मागण्यांसाठी १८ जानेवारीपासून एटापल्ली येथे संदीप पोटामीचे आईवडील, ग्रामस्थ व एटापल्ली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय चरडुके यांनी उपोषण केले होते. या उपोषणाची दखल घेऊन शुक्रवारी २२ जानेवारी रोजी प्रभारी शल्य चिकित्सक डॉ. एस. बी. वानखेडे, प्रशासकीय अधिकारी व्ही. एम. अडाळू यांनी उपोषणकर्त्यांची मंडपात भेट घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली यांनी मागण्यांचे आश्वासन दिलेले पत्र उपोषकर्त्यांना सुपूर्द करीत उपोषण सोडविले. देखरेख समिती स्थापन करून कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची शहानिशा केली जाईल, असे आश्वासनही उपोषणकर्त्यांना देण्यात आले.