अटक होताच वर्षा खापर्डे रूग्णालयात
By Admin | Updated: April 5, 2015 01:42 IST2015-04-05T01:42:41+5:302015-04-05T01:42:41+5:30
एटापल्ली तालुक्यातील गर्भपाताच्या दोन प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या शालेय बाल आरोग्य तपासणी अभियानाच्या बडतर्फ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा खापर्डे ...

अटक होताच वर्षा खापर्डे रूग्णालयात
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील गर्भपाताच्या दोन प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या शालेय बाल आरोग्य तपासणी अभियानाच्या बडतर्फ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा खापर्डे यांना शुक्रवारी भंडारा येथून एटापल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यांना अटक करून एटापल्ली येथे नेताच त्यांची प्रकृती बिघडली, अशी तक्रार त्यांनी केली. त्यांना लागलीच एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात कडेकोट पोलीस बंदोबस्तात रात्रभर ठेवण्यात आले. त्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे व दूरध्वनीवरून एटापल्ली पोलिसांना संदेश देण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने डॉ. वर्षा खापर्डे यांना १४ एप्रिलपर्यंत अंतरिम जामिन मंजूर केला आहे, अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर लागलीच एटापल्ली पोलिसांनी वर्षा खापर्डे यांना जामिनावर मुक्त केले. त्यांच्या या प्रकरणात आता १४ नंतर पोलीस न्यायालयात अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)
जागता पहारा
वर्षा खापर्डे रात्रभर रूग्णालयात दाखल असल्याने रूग्णालयाच्या सभोवताल एटापल्ली पोलिसांचा जागता पहारा रात्रभर होता.