शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

अतिदुर्गम नारगुंडा गावात पोहचले प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 12:39 AM

तहसीलदार कैलास अंडील यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह नारगुंडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी किरण वाघ यांच्यासोबत स्वत: पायदळ चालत नारगुंडा गावाची पाहणी केली. त्यानंतर नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दितील कुचेर, खडी, नैनवाडी, मुत्तेमकुही, पिडमिली व कोठी येथील ग्रामस्थांची जनसंपर्क बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देनागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप : तहसीलदारांच्या पुढाकाराने ग्रामस्थांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील व नायब तहसीलदार सोनवाने यांनी अतिदुर्गम नक्षलग्रस्त संवेदनशील असलेल्या तालुक्यातील नारगुंडा गावाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. दरम्यान ग्रामस्थांची जनसंपर्क बैठक घेऊन नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.तहसीलदार कैलास अंडील यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह नारगुंडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी किरण वाघ यांच्यासोबत स्वत: पायदळ चालत नारगुंडा गावाची पाहणी केली. त्यानंतर नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दितील कुचेर, खडी, नैनवाडी, मुत्तेमकुही, पिडमिली व कोठी येथील ग्रामस्थांची जनसंपर्क बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान तहसीलदार अंडील यांनी सर्व ग्रामस्थांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यासाठी लागणारे सर्व कागदपत्र तहसील कार्यालयातून त्वरीत पुरविण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी नारगुंडा परिसरातील सर्व गावातील लोकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. या समस्या सोडविण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणार असे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी प्रतिसाद फाऊंडेशन यवतमाळचे अध्यक्ष मनोज गुलाने व त्यांची चमू उपस्थित होती. याप्रसंगी सर्व ग्रामस्थांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गावचे कोतवाल मनोहर पुंगाटी यांनी केले तर आभार पोलीस उपनिरिक्षक तुकाराम खडके यांनी मानले. कार्यक्रमाला महसूल विभागाचे कर्मचारी दिनकर परसा, रामजी वड्डे, गाव पाटील बिरजू पुंगाटी, सतू हेडो, कातीय कुड्यामी, बाजीराव मडावी आदी उपस्थित होते. तहसीलदारांच्या भेटीमुळे व त्यांनी केलेल्या मदतीमुळे सर्व ग्रामस्थांच्या चेहºयावरील आनंद पाहण्यासारखा होता.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार