१२ जणांच्या मृत्यूसह ३०५ बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:38 IST2021-04-20T04:38:02+5:302021-04-20T04:38:02+5:30
एकूण काेराेना बाधितांची संख्या १५ हजार ३१४ एवढी झाली आहे. त्यापैकी ११ हजार ९५५ जणांनी काेराेनावर मात केली आहे. ...

१२ जणांच्या मृत्यूसह ३०५ बाधितांची भर
एकूण काेराेना बाधितांची संख्या १५ हजार ३१४ एवढी झाली आहे. त्यापैकी ११ हजार ९५५ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ३ हजार १३४ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण २२५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज १२ नवीन मृत्यूमध्ये कुरखेडा येथील ७१ वर्षीय पुरूष, अहेरी तालुक्यातील मड्डीगुडम येथील ४५ वर्षीय पुरूष, चामाेर्शी येथील ७० वर्षे वयाची महिला, देसाईंगज तालुक्यातील काेंढाळा येथील ४२ वर्षीय पुरूष, बाेळधा येथील ६० वर्षीय पुरूष, आरमाेरी तालुक्यातील मानापूर येथील ३८ वर्षीय महिला, गाेंदिया जिल्ह्यातील अर्जुनी माेरगाव तालुक्यातील ६० वर्षीय पुरूष, गडचिराेली शहरातील हनुमान नगरातील ६० वर्षीय पुरूष, विवेकानंद नगरातील ७० वर्षीय महिला, कन्नमवार वाॅर्डातील ७२ वर्षीय पुरूष, आरमाेरीतील ४५ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
नवीन ३०५ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १८४, अहेरी तालुक्यातील ९, आरमोरी ३५, चामोर्शी
११, धानोरा तालुक्यातील ८, एटापल्ली तालुक्यातील ५, कोरची तालुक्यातील ७, कुरखेडा १६ , मुलचेरा ७, सिरोंचा तालुक्यातील २ तर देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये २१ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या २६३ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील १०१, अहेरी ११, आरमोरी १९, भामरागड ५, चामोर्शी ११, धानोरा २३ , एटापल्ली १२, मुलचेरा २, सिरोंचा ५, कोरची ८, कुरखेडा २९, तसेच देसाईगंज तालुक्यातील ३७ जणांचा समावेश आहे.