जिल्ह्यात नवीन ११९ बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST2020-10-08T05:00:00+5:302020-10-08T05:00:32+5:30
सद्य:स्थितीत जिल्ह्यातील क्रियाशील कोरोना बाधितांचा आकडा ९५४ झाला आहे. आतापर्यंतची एकूण कोरोना बाधित संख्या ३५०५ वर पोहोचली आहे. तर यापैकी २५३० जणांनी कोरोनावर मातही केली आहे. यानुसार ७२.१८ टक्के रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या जिल्ह्यात आहे. क्रियाशिल रूग्णांची टक्केवारी २७.२२ असून मृत्यूदर ०.६० टक्के आहे.

जिल्ह्यात नवीन ११९ बाधितांची भर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या आठवडाभरापासून सरासरी १०० च्या पटीत रुग्णसंख्या वाढत असून ७ ऑक्टोबर रोजी बुधवारला गडचिरोली शहरासह जिल्हाभरात एकूण नवीन ११९ बाधित रुग्णांची भर पडली. तर ५१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. गडचिरोली जिल्ह्यात अॅक्टीव्ह रुग्णांची टक्केवारी २७.२२ असून मृत्यूदर ०.६० टक्के आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यातील क्रियाशील कोरोना बाधितांचा आकडा ९५४ झाला आहे. आतापर्यंतची एकूण कोरोना बाधित संख्या ३५०५ वर पोहोचली आहे. तर यापैकी २५३० जणांनी कोरोनावर मातही केली आहे. यानुसार ७२.१८ टक्के रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या जिल्ह्यात आहे. क्रियाशिल रूग्णांची टक्केवारी २७.२२ असून मृत्यूदर ०.६० टक्के आहे.
बुधवारी आढळलेल्या नवीन ११९ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ५८, अहेरी ९, चामोर्शी ६, भामरागड १, धानोरा १०, एटापल्ली १०, कोरची २, कुरखेडा ६, मुलचेरा १, सिरोंचा २ व वडसा येथील १४ जणांचा समावेश आहे. तसेच आजच्या ५१ कोरोनामुक्त रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २९, आरमोरी ४, भामरागड २, चामोर्शी १, धानोरा १, एटापल्ली १, मुलचेरा १, सिरोंचा २, कुरखेडा १ व वडसा येथील ९ जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ५८ बाधितांमध्ये आयटीआय चौक २, गोकुळनगर ४, रामनगर १, सुयोगनगर १, कन्नमवार नगर १, कॅम्प एरिया १, चामोर्शी मार्ग १, चंद्रपूर रोड २, कलेक्टर कॉलनी २, दुर्गा मंदिर चौक १, गांधी वार्ड २, शहर २, विद्यापीठ कॉम्प्लेक्स १, इतर जिल्ह्यातील ३, कारगिल चौक १, खरपुंडी ४, कुंभीटोला येथील १, कुरूड येथील १, माडेतुकूम १, इतर राज्यातील १, मेडिकल कॉलनी १, नवेगाव ४, एनटीसी होस्टेल १, बोदली पीएचसी २, पोलीस स्टेशन गडचिरोली १, रामनगर ३, रामपुरी वार्ड ५, रेव्हेन्यू कॉलनी १, शिवाजी कॉलनी १, स्नेहनगर १, शिक्षक कॉलनी अयोध्यानगर १, त्रिमूर्ती चौक १, येवली गावातील २ जणांचा समावेश आहे. नवीन रुग्णांची जिल्ह्यात दररोज भर पडत असल्याचे दिसून येते.
विना मास्क नागरिकांचा बाजारपेठेत वावर
दररोज जिल्ह्यात १०० पेक्षा अधिक कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळून येत आहेत. संख्या वाढत असली तरी अनलॉक झाल्यापासून नागरिकांमध्ये भीती उरली नाही. गडचिरोली शहर व जिल्ह्याच्या बाजारपेठेत तसेच दैनंदिन गुजरीत लोक विनामास्क फिरत आहेत.