काेराेनाच्या संकटात भर; जिल्हाभरात तापाची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:37 IST2021-07-31T04:37:18+5:302021-07-31T04:37:18+5:30
बाॅक्स..... बालकांसाठी २० टक्के खाटा राखीव काेराेनाची तिसरी लाट बालकांसाठी घातक ठरू शकते, असा अंदाज काही तज्ज्ञ व्यक्त करीत ...

काेराेनाच्या संकटात भर; जिल्हाभरात तापाची साथ
बाॅक्स.....
बालकांसाठी २० टक्के खाटा राखीव
काेराेनाची तिसरी लाट बालकांसाठी घातक ठरू शकते, असा अंदाज काही तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आराेग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून २० टक्के खाटा राखीव ठेवल्या आहेत.
बाॅक्स ...
सारख्याच लक्षणांमुळे संभ्रम
काेराेनाची लागण झाल्यास ताप येणे, अंगदुखी, डाेकेदुखी, खाेकला, आदी लक्षणे दिसून येतात. पावसाळ्यामध्ये अनेकांना ताप आल्यानंतर अंगदुखी, डाेकेदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे ताप आल्यानंतर त्याला काेराेना समजायचा की सामान्य ताप आहे हे सहजासहजी लक्षात येत नाही.
बाॅक्स .....
ताप आला म्हणजे काेराेना आहे असे नाही
एखाद्या व्यक्तीला ताप आला म्हणजे, काेराेना आहे असे हाेत नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित व्यक्तीची सर्वप्रथम काेराेना चाचणी करण्याचे निर्देश आहेत. याचे पालन खासगी दवाखान्यांनीसुद्धा करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
बाॅक्स ...
उपचार घेणारे रुग्णअहेरी ०
आरमाेरी १
भामरागड ०
चामाेर्शी १५
धानाेरा २
एटापल्ली ०
गडचिराेली १६
कुरखेडा २
काेरची ०
मुलचेरा १४
सिराेंचा ५
देसाईगंज २
एकूण ५७
बाॅक्स .
काेराेनाचे एकूण रुग्ण - २,३५५
मृत्यू - ७४४