आबांच्या निधनाने राकाँ कार्यकर्ते गहिवरले
By Admin | Updated: February 18, 2015 01:22 IST2015-02-18T01:22:12+5:302015-02-18T01:22:12+5:30
पाच वर्ष गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळलेल्या आर. आर. पाटील यांची नाळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत जोडली होती.

आबांच्या निधनाने राकाँ कार्यकर्ते गहिवरले
गडचिरोली : पाच वर्ष गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळलेल्या आर. आर. पाटील यांची नाळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत जोडली होती. त्यांच्या एकाकी निधनाने सर्वांनाच धक्का बसला. स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रत्येक कार्यकर्ता शोकाकूल होऊन आबांबद्दलचे अनुभव कथन करीत होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव सुरेश पोरेड्डीवार यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, डॉ. हेमंत अप्पलवार, रवींद्र वासेकर, ऋतूराज हलगेकर, माजी जि. प. अध्यक्ष हर्षलता येलमुले, प्राचार्य मंजुषा विष्णोई, संजय निखारे, अरूण हरडे, हेमंत जंबेवार, श्रीनिवास गोडसेलवार, सोनाली पुण्यपवार, नंदलाल लाडे, सुवर्णा रेभनकर, अविनाश वरगंटीवार, किशोर गद्देवार, प्राचार्य टी. के. बोरकर, प्रा. लांजेवार, दादाजी चुधरी, प्रशांत पोरेड्डीवार, सुधाकर चन्नावार, प्राचार्य जयंत येलमुले, अमिन जीवानी, रफीक शेख, रिंकू पापडकर, पुंडलिक चौधरी, गोविंदराव चन्नावार, अनिल खेवले, आकाश पगाडे, वच्छला बारसिंगे, रूपा वल्के, अॅड. किशोर आखाडे, चंदू शिवणकर, भूषण तिवारी, केशव पोरेड्डीवार, भगवान गेडाम, वामन म्हशाखेत्री, नत्थू अंडेलकर, लिलाधर भरडकर, अक्षय येडेवार, राहुल बारसिंगे, पिपरे, रामचंद्र वाढई, तुकाराम पुरणवार, रवींद्र किरमिरवार, मरू सोतरे, संजय अलोणे, मंदीप गोरडवार, हेमंत रामटेके, रूपेश वल्के, सचिन चौधरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आबांनी राज्यभरातील जनतेला स्वच्छतेचा संदेश दिला. या संदेशामुळे आज राज्यातील शेकडो गावे सुशोभित झाली आहेत. हीच योजना केंद्रही राबवित आहे. लोकशाहीच्या माध्यमातून विकासावर विश्वास ठेवणाऱ्या आबांनी जिल्ह्यातील नक्षल चळवळीला अनेक हादरे दिले. त्याचबरोबर आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांच्या विकासासाठी शेकडो कोटी रूपयांचा निधी खेचून आणला, असल्याचे म्हटले. या कार्यक्रमानंतर इंदिरा गांधी चौकातही आर. आर. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)