शाळेत सतत गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर होणार कारवाई
By Admin | Updated: November 25, 2014 22:55 IST2014-11-25T22:55:18+5:302014-11-25T22:55:18+5:30
शाळांवर सतत गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांविरूध्द तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांनी आज मंगळवारी दिले.

शाळेत सतत गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर होणार कारवाई
अहेरी : शाळांवर सतत गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांविरूध्द तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांनी आज मंगळवारी दिले.
अहेरी पंचायत समितीच्या कार्यालयात जिल्हा परिषद अध्यक्षांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, अहेरी पं.स.च्या सभापती रविना गावडे, उपसभापती सोनाली कंकडालवार, जिल्हा परिषद सदस्य लैजा चालुरकर, पं.स. सदस्य ऋषी पोरतेट, संवर्ग विकास अधिकारी चांदेकर यांच्यासह पं.स.तील विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी आरोग्य, शिक्षण या विभागाची संपूर्ण माहिती अध्यक्षांनी जाणून घेतली. अहेरी भागात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे किती पद रिक्त आहेत. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची नेमकी परिस्थिती काय आहे. आदीचा आढावा अध्यक्षांनी यावेळी घेतला. ज्या जि.प.च्या शाळांमध्ये शिक्षक नियमितपणे हजर राहत नाही. त्यांच्याविरूध्द तत्काळ कारवाई करा, असे निर्देश त्यांनी पं.स.च्या प्रशासनाला दिले. ग्रामपंचायतस्तरावर सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती ग्रामसेवकांकडून अध्यक्षांनी जाणून घेतली. बीआरजीएफ योजनेच्या कामाचा आढावाही यावेळी घेण्यात आला. पंचायत समिती अहेरीतर्फे जि.प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, जि.प. सभापती अजय कंकडालवार यांचा शाल, श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)