संचारबंदी न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:00 AM2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:01:06+5:30

मंगळवारी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी बैठक घेऊन अशा नागरिकांविरोधात कडक पावले उचलून कडक कारवाई करावी, असे निर्देश तहसीलदारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून दिले. तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी व सर्व तालुका पोलीस अधिकारी यांच्याशी संयुक्तपणे झालेल्या ऑनलाईन बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहीत गर्ग प्रामुख्याने हजर होते.

Action will be taken against those who do not comply with the ban | संचारबंदी न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार

संचारबंदी न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : पहिल्या दिवशी अनेक नागरिक पडले घराबाहेर, विनाकारण फिरणाºयांना मिळणार पोलिसांचा ‘प्रसाद’

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी लागू केल्यानंतरही काही नागरिक मंगळवारी विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने संचारबंदी लागू केली तो उद्देशच निष्फळ ठरण्याची शक्यता दिसून आली. यासंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी बैठक घेऊन अशा नागरिकांविरोधात कडक पावले उचलून कडक कारवाई करावी, असे निर्देश तहसीलदारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून दिले.
तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी व सर्व तालुका पोलीस अधिकारी यांच्याशी संयुक्तपणे झालेल्या ऑनलाईन बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहीत गर्ग प्रामुख्याने हजर होते.
संचारबंदीत कोणी ऐकत नसेल तर पोलिसांना व प्रशासनाला कारवाई करण्याची तरतूद कलम १४४ व साथरोग नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आहे. संचारबंदीदरम्यान फक्त आवश्यक सेवांसाठीच फिरण्याची परवानगी असताना काही नागरिक विनाकारण फिरत असतील तर हे कायद्याचे उल्लंघन आहे.
कोरोना संसर्ग साखळीतील आताची परीस्थिती निर्णायक स्तरावर पोहोचली आहे. नागरिकांनी गांभीर्याने संसर्ग साखळी समजून घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील परिस्थिती चांगली असताना आपण सहकार्य केले नाही तर प्रशासन, पोलीस किंवा आरोग्य विभागही संसर्ग रोखू शकत नाही. जगातील संसर्ग झालेल्या देशांमधील अनुभवावरून फक्त नागरिकच संसर्गसाखळी तोडू शकतात, असे दिसून आले आहे. जनतेच्या हितासाठी प्रशासन कठोर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. गावस्तरावर पोलीस पाटील व ग्राम पाटील यांची मदत घेतली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बैठकीत दिली.
गडचिरोली शहरातील महात्मा फुले वॉर्डात कोरोना बाधिताच्या भितीने नागरिकांनी काटेरी झाडे टाकून रस्ता अडविला होता.

पोलीस, आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करा
जनेतेच्या हितासाठी करोना संसर्ग रोखण्याबाबत प्रशासन वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देत आहे, त्याचे पालन नागरिकांकडून होणे गरजेचे आहे. पोलीस विभागही संचारबंदीच्या अनुषंगाने महत्वाचे योगदान रस्त्यावर उभे राहून देत आहेत. त्यांना नागरीकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोग्यविषयक काळजी घ्या. करोना संसर्ग होवू नये म्हणून कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. अफवांवर विश्वास ठेवून कोणत्याही स्थितीत चुकीचे उपचार घेवू नका, असे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी केले.

आपली जीवनावश्यक कामे कशी करावीत?
सर्वत्र संचारबंदी आहे, मग जीवनावश्यक कामे कशी करावीत यासाठी प्रशासनाकडे विचारणा होत आहे. राज्य शासनाकडून दि.२३ मार्च रोजी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे सूचना दिलेल्या आहेत. कोणत्याही आरोग्यविषयक आपतकालीन स्थितीत खाजगी वाहतुकीला परवानगी आहे. मात्र त्यांचे बरोबर दोन व्यक्तींना फिरण्यास परवानगी आहे. तसेच आवश्यक किराणा व इतर बाबी खरेदी करण्यासाठी चालक व त्याबरोबर एका व्यक्तीला सूट देण्यात आली आहे. मात्र प्रत्येक फिरणाºया नागरीकांनी फिरत असल्याबाबतचे कारण शासनाने सूट दिलेल्या कारणांपैकी असावे.

बाहेरून आलेले ५९५० नागरिक राहणार निरीक्षणात
जिल्ह्यात २० मार्च २०२० पासून परदेशातून, परराज्यातून, परजिल्ह्यातून आलेल्या सर्वच प्रवाशांचे घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात मंगळपर्यंत ५९५० प्रवाशांची नोंद करण्यात आलेली आहे. या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आता खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वच नागरीकांना प्रशासन त्यांच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवणार आहे.
२४ मार्चपासून शासकीय कर्मचारी व आशा यांचेमार्फत घरोघरी जावून त्या प्रवाशांच्या घरावर स्टीकर लावणे व त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. आशामार्फत सदर प्रवाशांच्या घरी भेटी देवून पुढील १४ दिवस पाठपुरावा करण्यात येईल. यासाठी त्या नागरीकांनी सहकार्य करावे, अन्यथा त्यांना सक्तीने शासकीय क्वारंटाईन कक्षात हलविण्यात येणार आहे.

Web Title: Action will be taken against those who do not comply with the ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.