Action on the rotators without reason | विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

ठळक मुद्देपोलिसांचीही गस्त : भामरागड न. पं. ने उचलले पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : स्त्यावर थुंकणे, तोंडाला मास्क न बांधणे तसेच विनाकारण मुख्य बाजारात गाडीवर फिरणाऱ्यांवर ५०० रूपये दंडात्मक कारवाई करण्याचे पाऊल भामरागड नगर पंचायतीने उचलले आहे. याशिवाय ठाणेदार संदीप भांड यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी २४ तास गस्त घालत आहेत.
मागील काही दिवसांपासून शहरात विनाकारण फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली होती. वारंवार सूचना देऊनही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरायचे. परंतु आता विनाकारण फिरणाऱ्यांवर ५०० रूपये व रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर १०० रूपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये, स्वच्छता राखावी, वारंवार हात धुवावे, अशी सूचना प्रशासनाने केली होती. चोख पोलीस बंदोबस्त लावला होता. याशिवाय प्रभारी तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, मुख्याधिकारी सूरज जाधव, बीडीओ स्वप्नील मगदुम, पुरवठा निरीक्षक सदाशिव गावडे यांनी भाजीपाला विक्रेते, मेडिकल, बँक आदी ठिकाणी दिली होती.

Web Title: Action on the rotators without reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.