शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
5
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
6
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
7
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
8
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
9
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
10
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
11
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
12
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
13
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
14
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
15
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
16
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
17
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
18
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
19
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
20
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

गडचिरोलीत विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 19:27 IST

कोरोेना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगर पंचायत प्रशासनाने एटापल्ली, धानोरा, देसाईगंज, कोरची येथे दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.

ठळक मुद्देएटापल्ली, धानोरा, देसाईगंज, कोरची येथे धडक कारवाई१०० वर नागरिकांकडून दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या अनेक नागरिकांवर गडचिरोली शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत दंडात्मक कारवाई करण्यात आली.कोरोेना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगर पंचायत प्रशासनाने एटापल्ली, धानोरा, देसाईगंज, कोरची येथे दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.एटापल्ली - येथील मुख्य रस्त्यावर १५ सप्टेंबर रोजी मंगळवारला आठवडी बाजार भरला. दरम्यान या ठिकाणी महसूल, पोलीस विभाग व नगर पंचायतीच्या वतीने संयुक्त कारवाई राबवून मास्क न वापरणाºया विक्रेते व ग्राहकांकडून दंड वसूल केला. यावेळी एकूण १२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करून त्यांना पावती देण्यात आली. या कारवाईमुळे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.

धानोरा - येथे मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांवर १५ सप्टेंबर रोजी दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करण्यात यावा, अन्यथा दंड आकारण्यात येईल, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. दरम्यान नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने मोहीम राबवून नागरिकांमध्ये जागृती मास्क वापराबाबत करण्यात आली. विनामास्क आढळलेल्या सात व्यक्तींवर प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे १ हजार ४०० रुपये दंड आकारण्यात आले. यामध्ये काही दुकानदार सुद्धा विनामास्क आढळून आले. शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याच्या सूचना नगर पंचायतीने काढल्या आहेत. बाहेरच्या विक्रेत्यांना धानोरा शहरात येऊन दुकान लावण्याची परवानगी नाही. कोरोना संसर्ग आटोक्यात येईपर्यंत आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. स्थानिक विक्रेते येथे दररोज दुकान लावतील, असे मुख्याधिकाºयांनी सांगितले. कारवाईदरम्यान न.पं.मुख्याधिकारी नरेंद्र बेंदरे, कर्मचारी गुलाब ठाकरे, सत्यवान गुरनुले, देवनाथ गावतुरे, मुरलीधर बोगा, उमेश नागापुरे आदी उपस्थित होते.

देसाईगंज - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देसाईगंज नगर परिषद प्रशासनाने बुधवारपासून मास्क न लावता फिरताना लोकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. मात्र विलगीकरणात असलेले नागरिक कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने आवश्यक त्या प्रमाणात भीती नव्हती. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर जिल्हा सीमेवरील चेकपोस्ट हटविण्यात आले. दरम्यान मुक्त संचार वाढल्याने कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले. प्रादुर्भाव आणखी वाढू नये, या उद्देशाने मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांच्या नेतृत्वात न.पं.च्या सर्व कर्मचाºयांनी वेगवेगळ गट करून मास्क न घालता सैराटपणे फिरणाºया २५५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून ३१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवावे, मास्कचा वापर करावा, असे मुख्याधिकारी रामटेके यांनी म्हटले आहे.

कोरची - येथील नगर पंचायत प्रशासनाने शहरात विनामास्क फिरणाºया १४ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून एकूण १ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपमुख्याधिकारी व्ही.व्ही.हाके यांच्या नेतृत्वात सुधीर ढोले, जयपाल मोहुर्ले, नरेंद्र कोतकोंडावार, विजय जेंगठे, अनिल वाढई, उत्तम बागडेरिया यांनी केली आहे. नगर पंचायतीने विनामास्क फिरणाºयांकडून आतापर्यंत ६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस