भामरागडात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:38 IST2021-04-20T04:38:06+5:302021-04-20T04:38:06+5:30
काेराेनाचा संसर्ग वाढत आहे. परंतु भामरागडसह तालुक्यात नागरिक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. बँक, दुकाने, हाॅटेलमध्ये शारीरिक अंतराच्या नियमाचे ...

भामरागडात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
काेराेनाचा संसर्ग वाढत आहे. परंतु भामरागडसह तालुक्यात नागरिक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. बँक, दुकाने, हाॅटेलमध्ये शारीरिक अंतराच्या नियमाचे उल्लंघन हाेत आहे. जिल्हाधिकारी यांनी १४ एप्रिल ते १ मेपर्यंत कडक निर्बंध घालून दिल्यानंतर व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाही नागरिक दुर्लक्ष करीत असल्याने भामरागड तालुका प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्यांवर १७ एप्रिलपासून कडक कारवाई करण्यात येत आहे. संचारबंदी नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल, पोलीस व नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी भरउन्हात रस्त्यावर उभे राहून कारवाई करण्यास सुरुवात केली. इशारा देऊन व दंडात्मक कारवाई करूनही न जुमानलेल्या मां गायत्री हाॅटेल सील करून १ मेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
===Photopath===
190421\19gad_6_19042021_30.jpg
===Caption===
भामरागड येथे कारवाई करताना अधिकारी व कर्मचारी.