दीक्षा बांबोळे मृत्यू प्रकरणात अखेर आरोपी युवकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:38 IST2021-07-28T04:38:12+5:302021-07-28T04:38:12+5:30

२१ जुलैला घरी कोणी नसताना तिच्या राहत्या घरीच दीक्षाचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. दरम्यान आपल्या मुलीने आत्महत्या ...

Accused youth finally arrested in Diksha Bambole death case | दीक्षा बांबोळे मृत्यू प्रकरणात अखेर आरोपी युवकाला अटक

दीक्षा बांबोळे मृत्यू प्रकरणात अखेर आरोपी युवकाला अटक

२१ जुलैला घरी कोणी नसताना तिच्या राहत्या घरीच दीक्षाचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. दरम्यान आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची गावातील प्रियकराने गळा आवळून हत्या केली, असा आरोप दीक्षाच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला होता. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी विनोद जकुलवार याला अटक केली.

विनोदला मंगळवारी चामोर्शी येथील न्यायालयापुढे हजर केले असता त्याला ३० जुलैपर्यंत पीसीआर देण्यात आला आहे. आरोपी विनोद याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीक्षाने आत्महत्याच केली की, तिची गळा आवळून हत्या झाली, हे पोलीस तपासात स्पष्ट होईल. या प्रकरणाचा तपास अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर करत आहे.

Web Title: Accused youth finally arrested in Diksha Bambole death case