आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी

By Admin | Updated: February 25, 2016 01:18 IST2016-02-25T01:18:24+5:302016-02-25T01:18:24+5:30

जि. प. सदस्य डॉ.तामदेव दुधबळे यांनी ‘३०-५४’ व ‘१३ वने’ शीर्षकांतर्गत करावयांच्या कामातील अनियमितता व असमतोलासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...

The accused should apologize | आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी

आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी

विकास कामे अडवू नका : अतुल गण्यारपवार यांचा जि. प. सदस्यांना सल्ला
गडचिरोली : जि. प. सदस्य डॉ.तामदेव दुधबळे यांनी ‘३०-५४’ व ‘१३ वने’ शीर्षकांतर्गत करावयांच्या कामातील अनियमितता व असमतोलासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात १ फेब्रुवारीला याचिका दाखल केली होती. उपरोक्त शीर्षांतर्गत मंजूर कामांना स्थगिती द्यावी, अशी त्यांची मागणी होती. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने युक्तीवाद ऐकल्यानंतर विकास कामांत अडथळा होऊ नये, सदर मुद्दा लक्षात घेऊन या कामावरील स्थगिती उठविली व सदर कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. बांधकाम समितीच्या कामात अनियमितता आढळून आली नसल्याचे सिद्ध झाल्यामुळे जि. प. सदस्य डॉ. तामदेव दुधबळे, जगन्नाथ बोरकुटे यांच्यासह त्यांच्या सहकारी जि. प. सदस्यांनी आपली जाहीर माफी मागावी, असा सल्ला जि. प. चे बांधकाम व वित्त सभापती अतुल गण्यारपवार यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला.
यावेळी माहिती देताना गण्यारपवार म्हणाले, जि. प. ला ३०-५४ लेखा शीर्षाखालील १६ कोटी ९८ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून १४२ कामांना मान्यता देण्यात आली. तर १३ वने निधी अंतर्गत ७४२ लाख रूपयांतून १४२ कामांना मंजुरी देण्यात आली. जि. प. च्या बांधकाम समितीने शासन नियमानुसार या कामांचे नियोजन केले. अधिकाऱ्यांनीही सर्व बाबी तपासून या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिली. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. या कामाचे वर्क आॅर्डर देण्याच्यावेळी जि. प. सदस्य डॉ. तामदेव दुधबळे, जगन्नाथ बोरकुटे यांच्यासह काही सदस्यांनी या कामात अनियमितता होत असल्याचा आरोप करीत विशेष सभेची मागणी केली. मात्र विशेष सभेमध्ये विरोधक जि. प. सदस्यांची बाजू लंगडी पडली. न्यायालयानेही त्यांना मोठी चपराक दिली. त्यामुळे जि. प. सदस्यांनी विकास कामात अडथळे आणू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)

Web Title: The accused should apologize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.