शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

भूसुरुंग स्फोटातील आरोपी अटक! १५ जवानांच्या हत्येत सहभागी माओवादी जाळ्यात

By संजय तिपाले | Updated: June 28, 2025 16:38 IST

जहाल माओवादी 'अंकल' गजाआड : १५ जवानांचा बळी घेणाऱ्या जांभूळखेडा स्फोटात होता सक्रिय सहभाग

गडचिरोली :  तीन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा दौऱ्यावेळी भेट दिलेल्या छत्तीसगड सीमेवरील कवंडे येथे घातपात घडवून आणण्याकरता रेकी करत असताना एका जहाल माओवाद्याला २७ जून रोजी पोलिसांनी जेरबंद केले. अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो (२८,रा. कवंडे ता. भामरागड) असे त्याचे नाव आहे. कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथे सहा वर्षांपूर्वी भूसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यातही त्याचा सक्रिय सहभाग होता.

एकेकाळी माओवाद्यांचे आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवंडे येथे पोलिसांनी माओवादविरोधी अभियान गतिमान केले आहे.२७ जून रोजी  कवंडे जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथकाची दोन पथके,  कवंडे येथील पोलिस पथक आणि राज्य राखीव दलाच्या कंपनी ३७ बटालियनचे एक पथक माओवादविरोधी अभियान राबवित होते. यावेळी त्यांना एक संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आल्याने  त्याला ताब्यात घेतले होते. पोलिस मुख्यालयात आणून त्याची चौकशी केली असता तो अंकल उर्फ मन्नू सुलगे पल्लो असल्याचे निष्पन्न झाले. सध्या तो कोरची दलममध्ये उपकमांडर म्हणून कार्यरत होता.  

कवंडे जंगल परिसरात घातपात करण्याकामी रेकी करण्यासाठी आल्याची कबुली त्याने दिली. त्याच्यावर पाच गुन्हे नोंद असून तपासकामी त्यास कुरखेडा पोलिसांच्या ताब्यात दिले. २८ रोजी त्यास कुरखेडाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी  ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.  पोलिस अधीक्षक नीलोत्पल,अपर अधीक्षक एम. रमेश,   श्री. सत्य साई कार्तिक,   उपअधीक्षक (अभियान)  विशाल नागरगोजे व भामरागडचे उपअधीक्षक अमर मोहिते, कुरखेडाचे उपअधीक्षक रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली   कवंडेचे प्रभारी अधिकारी  उपनिरीक्षक मंदार शिंदे, विशेष अभियान पथक तसेच सीआरपीएफ ३७ बटा. सी-कंपनीचे अधिकारी व जवान यांनी पार पाडली.   

दोन मोठ्या हल्ल्यांत सहभाग२ मे २०२९ रोजी  कुरखेडा तालुक्यातील  जांभूळखेडा जंगल परिसरात झालेल्या भुसुरुंग स्फोटात १५  जवान शहीद झाले होते. या हल्ल्यामध्ये   अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो याचा सक्रिय सहभाग होता. यासोबतच खोब्रामेंढा जंगलात २९ मार्च २०२१ रोजी झालेल्या चकमकीतही तो सामील होता. त्याच्यावर शासनाचे सहा लाखांचे बक्षीस होते.  

१३ व्या वर्षी नक्षल चळवळीत

वयाच्या तेराव्या वर्षीच अंकल उर्फ मन्नू पल्लो हा नक्षल चळवळीत दाखल झाला. मूळचा कवंडेचा असलेल्या अंकल  २०१२ मध्ये छत्तीसगडमधील माओवाद्यांच्या निब कंपनीतून सदस्य पदावर भरती झाला. २०२७ मध्ये तो भामरागड दलममध्ये बदली होऊन आला. २्०१७ ते २०२० या दरम्यान कोरची दलममध्ये उपकमांडर म्हणून त्याने काम केले. २०२० पासून तो  महाराष्ट्र -छत्तीसगड सीमेवर कवंडे जंगल परिसरात राहून माओवादी चळवळीत  काम करायचा.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली