पेपरला तीनच तास दिल्याचा आरोप

By Admin | Updated: April 25, 2017 00:38 IST2017-04-25T00:38:30+5:302017-04-25T00:38:30+5:30

गोंडवाना विद्यापीठांतर्गत २२ एप्रिलला स्ट्रक्चरल अ‍ॅनॉलिसीस २ हा पेपर घेण्यात आला. सदर पेपर चार तासाचा होता

Accused of giving three hours to the paper | पेपरला तीनच तास दिल्याचा आरोप

पेपरला तीनच तास दिल्याचा आरोप

कुलगुरूंना निवेदन : चौकशी करण्याची एनएसयूआयची मागणी
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठांतर्गत २२ एप्रिलला स्ट्रक्चरल अ‍ॅनॉलिसीस २ हा पेपर घेण्यात आला. सदर पेपर चार तासाचा होता परंतु या पेपरसाठी केवळ तीन तासाचाच अवधी देण्यात आला, असा आरोप करीत या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडिया (एनएसयूआय) च्या वतीने कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
२२ एप्रिल रोजी स्ट्रक्चरल अ‍ॅनॉलिसीस २ हा पेपर घेण्यात आला. सदर पेपर मागील सत्रात चार तासांचा होता. परंतु यावर्षी या पेपरला तीन तासांचा कालावधी देण्यात आला. या पेपरचा अभ्यासक्रम सुद्धा मागील वर्षीचाच आहे. सदर पेपर तीन तासात सोडविणे शक्य नाही. तरीसुद्धा मागील वर्षी चार तासात घेण्यात आलेला पेपर यंदा तीन तासाच्या कालावधीतच आटोपण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना योग्य गुण देऊन सदर चौकशी करावी, अशी मागणी एनएसयूआयचे अध्यक्ष नितेश राठोड व शिष्टमंडळाने केली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Accused of giving three hours to the paper