विद्यापीठाच्या वाहनाला अपघात

By Admin | Updated: October 9, 2015 01:55 IST2015-10-09T01:55:01+5:302015-10-09T01:55:01+5:30

कोरची येथील महाविद्यालयात उत्तरपत्रिका नेऊन दिल्यानंतर गडचिरोलीकडे परत येत असताना कोरची-कुरखेडा दरम्यान बेडगाव ...

Accident of the University vehicle | विद्यापीठाच्या वाहनाला अपघात

विद्यापीठाच्या वाहनाला अपघात

बेडगाव घाटावर पलटले : सुदैवाने जीवितहानी टळली
कोरची : कोरची येथील महाविद्यालयात उत्तरपत्रिका नेऊन दिल्यानंतर गडचिरोलीकडे परत येत असताना कोरची-कुरखेडा दरम्यान बेडगाव घाटावर वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर वाहन रस्त्यावरच पलटले. सदर अपघात बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडला.
विद्यापीठाच्या परीक्षा पुढील चार ते पाच दिवसांत सुरू होत आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका महाविद्यालयांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. एमएच ३३ जी १४१३ क्रमांकाचे वाहन धानोरा, मालेवाडा, कुरखेडा, कोरची येथील महाविद्यालयांना कोऱ्या उत्तरपत्रिका पोहोचून सदर वाहन परत येत असताना वाहनाला अपघात घडला. मात्र सुदैवाने चालक हेमंत सयाम याला काहीही झाले नाही. काही उत्तरपत्रिका अस्ताव्यस्त पडल्या होत्या. उत्तरपत्रिका उचलून व्यवस्थित वाहनामध्ये ठेवण्यात आल्या. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रणक डॉ. जगन्नाथ दडवे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर याबाबतची तक्रार बेडगाव पोलीस स्टेशनमध्ये केली, अशी माहिती दडवे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Accident of the University vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.