तिसरी लाट येण्यापूर्वी लसीकरणाचा वेग वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:24 IST2021-06-20T04:24:39+5:302021-06-20T04:24:39+5:30
काेरची तहसील कार्यालयात १७ फेब्रुवारीला सभा घेऊन तालुक्यातील काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा तहसीलदारांनी घेतला. ...

तिसरी लाट येण्यापूर्वी लसीकरणाचा वेग वाढवा
काेरची तहसील कार्यालयात १७ फेब्रुवारीला सभा घेऊन तालुक्यातील काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा तहसीलदारांनी घेतला. कोरची तालुक्यात आतापर्यंत ग्रामीण रुग्णालयामध्ये १ हजार ३५५ लाेकांनी काेराेना प्रतिबंधक लस घेतली. कोटगूल प्राथमिक आराेग्य केंद्रात ९६९, बोटेकसा आराेग्य केंद्रात २००७ अशा एकूण ४ हजार ३३१ लाेकांनी लसीचा पहिला डोस घेतला. जिल्ह्यात सर्वांत कमी लसीकरण कोरची तालुक्यात झाल्याचे निदर्शनास आले आहे. लसीकरणाचे प्रमाण कसे वाढविता येईल याबाबत प्रभारी तहसीलदार बी. एन. नारनवरे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. विनोद मडावी, सहायक पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले, नगरपंचायत उपमुख्याधिकारी बाबासो हाक्के यांनी सविस्तर चर्चा केली. सभेला उपस्थित नाबार्ड संस्थेचे संघटक जयस्वाल म्हणाले, गावागावांत जाऊन त्यांच्या स्थानिक भाषेत लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले असून, नागरिकांना लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त केले आहे. सामाजिक कार्यकर्त्या कुमारी जमकातन यांनीसुद्धा नागरिकांमधील शंकांचे निरसन केले जात असल्याचे सांगितले.