खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:35 IST2021-05-15T04:35:13+5:302021-05-15T04:35:13+5:30

गडचिराेली: पावसाळा आता जवळ आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपूर्व मशागतीची कामे करण्यास सुरूवात केली आहे. दुपारी कडक ऊन राहत ...

Accelerate pre-kharif tillage | खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग

खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग

गडचिराेली: पावसाळा आता जवळ आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपूर्व मशागतीची कामे करण्यास सुरूवात केली आहे. दुपारी कडक ऊन राहत असल्याने सकाळच्या सुमारास कामे केली जात आहेत. चांगले पीक येण्यासाठी शेतीची मशागत आवश्यक आहे.

चामाेर्शी मार्गाची गती मंदावली

गडचिराेली: शहरातून चामाेर्शी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. रस्ता बांधकामासाठी शहरातून खाेदकाम करण्यात आले आहे. मात्र कामाची गती अतिशय मंद आहे. पावसाळ्यापूर्वी काम न झाल्यास खाेदलेल्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे.

नाली उपसण्यास यावर्षीही ठेंगा

वैरागड: ग्रामीण भागातील नाल्या वर्षातून एकदाच पावसाळ्यापूर्वीच उपसल्या जातात. मात्र काही ग्रामपंचयातींनी काेराेनाचे कारण पुढे करून नाली उपसा केलाच नाही. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण हाेण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Accelerate pre-kharif tillage