शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारकर्त्याचे काम निपटवून देण्याचाही एसीबीचा प्रयत्न

By admin | Updated: September 11, 2014 23:31 IST

अनेकदा संपर्क करूनही शासकीय कार्यालयातून काम होत नाही. या कामासाठी लाचेची मागणी केली जाते. अशा परिस्थितीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येण्याऐवजी पैसे देऊन काम करून

गडचिरोली : अनेकदा संपर्क करूनही शासकीय कार्यालयातून काम होत नाही. या कामासाठी लाचेची मागणी केली जाते. अशा परिस्थितीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येण्याऐवजी पैसे देऊन काम करून घेण्यावर अनेकजण भर देतात. ही बाब लक्षात घेऊन आता संबंधीत व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केल्यास त्याचे कामही करवून देऊन लाचखोरावर कारवाई करण्याबाबत एसीबी प्रयत्न करणार आहे, असे संकेत मिळाले आहे. अनेकदा शासकीय कार्यालयात सरकारी योजनांचा लाभ, कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा असलेला आर्थिक लाभ तसेच शासकीय कामाचे देयक काढण्यासाठी सर्वसामान्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. अशा प्रसंगी अनेकदा वरिष्ठ अधिकारी त्यांच्याअंतर्गत काम करणारे कनिष्ठ कर्मचारी हे लाच मागतात. आपण जर यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तर आपले काम कायमचे होणारच नाही, अशी भितीही अनेक तक्रारकर्त्यांच्या मनात असते. त्यामुळे ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे न येता पैसे देऊन आपले काम करून घेतात. त्यामुळे एसीबीकडे येणाऱ्या तक्रारींचा ओघ कमी होतो व भ्रष्टाचार करणारे निर्ढावतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरी विरोधात तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे रखडलेले काम पूर्ण करून देण्याचीही हमी उचलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अनेक लाचखोरांना अशा प्रकरणात जेरबंद केल्यावर एसीबीचे अधिकारी संबंधीत तक्रारकर्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी आपले कर्मचारी, अधिकारी त्या कार्यालयात पाठवून संबंधीत कामाचा पाठपुरावाही करण्याचे काम करीत आहे. अनेकदा लाचखोर पकडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जामीनावर सुटल्यावर तो पुन्हा त्या पदाच्या खूर्चीवर जाऊन बसतो. त्यामुळे तक्रारकर्ते धास्तावलेले असतात. आपले काम होईल की नाही याची शाश्वती त्यांना राहत नाही. त्यामुळे एसीबीने हे पुढचे पाऊल उचलले आहे. संबंधीत अधिकाऱ्याचे तत्काळ निलंबन व्हावे, यासाठी पकडलेल्या दिवशीच शासनाच्या जीआरनुसार संबंधीत लाचखोरावर निलंबनाची कारवाई करण्याबाबत त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पत्राद्वारे कळविले जाते, अशी माहिती एसीबीचे नागपूर विभागीय पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी लोकमतशी बोलताना दिली. एकूणच लाचखोरीच्या विरोधात कठोर मोहीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उभारली असून ही आता भ्रष्टाचाराच्या विरोधातील जनचळवळ व्हावी, यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापरही एसीबी करीत आहे. नागरिकांकरीता १०६४ हा टोल फ्री नंबरही देण्यात आला आहे. निर्भिडपणे नागरिकांनी सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा द्यावा, असे आवाहन जाधव यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)