आमगाव केंद्राचे शैक्षणिक संमेलन
By Admin | Updated: October 7, 2014 23:33 IST2014-10-07T23:33:55+5:302014-10-07T23:33:55+5:30
पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येत असलेल्या आमगाव केंद्राचे शैक्षणिक केंद्र संमेलन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वालसरा येथे मंगळवारी पार पडले.

आमगाव केंद्राचे शैक्षणिक संमेलन
चामोर्शी : पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येत असलेल्या आमगाव केंद्राचे शैक्षणिक केंद्र संमेलन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वालसरा येथे मंगळवारी पार पडले.
संमेलनादरम्यान संशोधक स्टीपन हाकिंग यांच्या पुस्तकाचा परिचय जे. पी. सोरते यांनी करून दिला. सोमनकर व एम. के. बारसागडे यांनी इंग्रजी वाचन व लेखन कसे करावे, या विषयावर अनुभव कथन केले. व केंद्र संमेलनात उपस्थित असलेल्या शिक्षकांना मार्गदर्शन केले. मेश्राम यांनी ज्ञानरचनावादावर आदर्श नमुना पाठ सादर केला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनावर मार्गदर्शन केले. विजय मेश्राम यांनी माझी समृद्ध शाळा या विषयावर मार्गदर्शन केले.
केंद्र प्रमुख रामटेके यांनी केंद्र संमेलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रातील शाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सदर उपक्रम विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्याने प्रत्येक शिक्षकाने सदर उपक्रम अत्यंत काळजीपूर्वक राबवावे, या उपक्रमांमध्ये पालक व विद्यार्थ्यांचा सहभाग जास्तीत जास्त राहील असे प्रयत्न करावे, केंद्र संमेलनात जिल्हा परिषद व खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या १ ते ८ पर्यंतच्या शाळांचे शिक्षक सहभाग झाले होते.
शिक्षणाधिकारी कार्यालयाच्यावतीने एक मुल, एक झाड, एक शाळा, एक बंधारा, अभ्यासाच्या वेळात टीव्ही बंद आदी उपक्रम राबविणे प्रत्येक शाळेला सक्तीचे करण्यात आले आहे. अभ्यासाच्या वेळात टीव्ही बंद हा उपक्रम राबविण्यासाठी पालकांची सभा घ्यावी, व या उपक्रमाचे महत्व पटवून द्यावे, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले. केंद्र संमेलन यशस्वीतेसाठी मुर्वतकर, सिडाम, आलाम, कोतावार, बाला, गोठामी यांच्यासह केंद्रातील शिक्षकांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)