अहेरीत निघाला मूकमोर्चा
By Admin | Updated: December 16, 2015 01:44 IST2015-12-16T01:44:27+5:302015-12-16T01:44:27+5:30
हजरत पैगंबर साहेब यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी अहेरी ...

अहेरीत निघाला मूकमोर्चा
निवेदन : शेकडो नागरिकांचा सहभाग
अहेरी : हजरत पैगंबर साहेब यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी अहेरी तालुक्यातील मुस्लीम समाजाच्या नागरिकांनी एसडीओ कार्यालयावर मूकमोर्चा काढून निवेदन सादर केले.
मुस्लीम समाजाच्या वतीने मंगळवारी अहेरी येथे उपविभागीय कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अहेरी तसेच तालुक्यातील हजारो मुस्लीम नागरिक सहभागी झाले होते. मौलाना आझाद चौक येथील मस्जिद येथून मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा जामा मस्जिद चौक, रजा मस्जिद या मार्गाने मोर्चा काढून सदर मोर्चा एसडीओ कार्यालयावर धडकला. मात्र उपविभागीय अधिकारी के. राममूर्ती हजर नसल्याने त्यांच्या मार्फतीने तहसीलदार एस. आर. पुप्पलवार यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनात हजरत पैगंबर यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले. मूकमोर्चात आलापल्ली, इंदाराम, बोरी आदी गावातील नागरिक सहभागी झाले होते.
या मोर्चाचे नेतृत्व अब्दुल जमीर हकीम, इरफान पठाण, मुस्ताक हकीम, अज्जु पठाण, मोहम्मद गौस, हमीद पठाण, अब्बास बेरा, रियाज पठाण, रमजान मिस्त्री, इसाक शेख, जलील काझी, कबिल शेख, मेहबूब अली, रियाज शेख, असलम खान, रफीक पठाण, जावेद शेख यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)