शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

अस्वलाशी आधी एकटाच झुंजला, शेतकरी धावले म्हणून बचावला

By संजय तिपाले | Updated: August 3, 2023 14:37 IST

मुरुमगावची घटना: धान रोवणी करताना हल्ला: जखमी तरुणावर उपचार सुरु 

गडचिरोली : धान रोवणीच्या कामात व्यग्र असलेल्या तरुणावर अस्वलाने हल्ला चढविला. सुरुवातीला त्याने एकट्यानेच अस्वलाशी झुंज दिली, पण प्रतिकार करतानाच आरडाओरड केल्याने इतर शेतकरी धावले व त्यांनी अस्वलाच्या तावडीतून त्यास सोडवले. ही घटना धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथे ३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली.

अशोक फरदीया (३७, रा. मुरूमगाव )असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. अतिवृष्टीमुळे धान राेवणीची कामे खोळंबली होती. पाऊस थांबल्यानंतर आता पुन्हा कामे वेगात सुरु आहेत. अशोक फरदीया हा स्वत:च्या शेतात धान रोवणी करत होता. यावेळी अस्वलाने अचानक हल्ला चढविला. डोक्यात पंजा मारल्याने मोठी दुखापत झाली. अशोक यांनी सुरुवातीला त्याच्याशी प्रतिकार केला, पण नंतर ओरडून इतर शेतकऱ्यांना बोलावले. त्यानंतर शेतकऱ्रूांनी धाव घेत अस्वलाला पिटाळून लावले. ते जंगलाच्या दिशेन पळूना गेले. जखमी अशोक फरदीया यांना तातडीने धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल  केले.  डोक्यातर गंभीर जखम झाली असून प्रकृती  स्थिर आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गजभे यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.

शेतकऱ्यांत दहशत

दरम्यान, मुरुमगावजवळ घनदाट जंगल आहे. त्यामुळे येथे हिंसक प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. धान रोवणी कामाच्या लगबगीत ही घटना घडल्याने शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. हिंस्त्र प्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा व तातडीने जखमी शेतकऱ्यास आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवFarmerशेतकरीGadchiroliगडचिरोली