गर्भवती महिलेवर दाेन नराधमांकडून अतिप्रसंग; माहेरी आली असताना घडली घटना
By दिगांबर जवादे | Updated: August 11, 2023 19:14 IST2023-08-11T19:14:09+5:302023-08-11T19:14:45+5:30
आराेपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

गर्भवती महिलेवर दाेन नराधमांकडून अतिप्रसंग; माहेरी आली असताना घडली घटना
गडचिराेली : सात महिन्यांची गर्भवती महिला माहेरी आली असताना गावातील दाेघांनी तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना कुरखेडा तालुका मूख्यालयापासून अगदी दाेन किलोमीटर अंतरावर असलेल्या धमदीटोला येथे गुरुवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे अतिप्रसंग करणारे दाेघे सख्खे भाऊ आहेत.
ताराचंद कपूरडेरिया (३०) व संजय कपूरडेरिया (३२), अशी अत्याचार करणाऱ्या नराधमांची नावे आहेत. पीडित महिला काही दिवसांसाठी माहेरी आली हाेती. पीडित महिलेच्या घरचे सदस्य बाहेर गेले हाेते. याची संधी साधत दाेन्ही नराधमांनी पिडित महिलेच्या घरात प्रवेश केला व तिच्यावर अत्याचार केला. पीडित महिलेने कूरखेडा पोलिस स्टेशन गाठत रात्रीच तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आराेपींविराेधात भादंवि ३७६, ३७६ (ड ) अन्वये गुन्हा दाखल केला. पाेलिस रात्रीच गावात पाेहाेचले. त्यांनी आराेपींना अटक केली.
शुक्रवारी आराेपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे. पीडितेला वैद्यकीय परीक्षणाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले आहे. घटनेचा तपास ठाणेदार संदीप पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक दिनेश गावंडे करीत आहेत. या विकृत घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आराेपी भावंडे गुंड प्रवृत्तीचे असल्याची माहिती आहे.