हत्तीसाेबत सेल्फीचा नाद बेतला जिवावर; मजुराला चिरडले
By गेापाल लाजुरकर | Updated: October 24, 2024 19:03 IST2024-10-24T19:02:18+5:302024-10-24T19:03:45+5:30
टस्करचे क्राैर्य : चामाेर्शी तालुक्यातील घटना

A selfie with an elephant turned out last; The laborer killed by an elephant
गडचिराेली : रानटी टस्कर हत्तीसाेबत सेल्फी काढण्याचा नाद एका मजुराच्या जिवावरच बेतला. टस्कर हत्तीने हल्ला करून या मजुराला चिरडून जागीच ठार केले. ही घटना चामाेर्शी तालुक्याच्या आबापूर जंगलात गुरुवारी (दि. २४) सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घडली.
श्रीकांत रामचंद्र सतरे (२३, रा. नवेगाव, भुजला, ता. मूल, जि.चंद्रपूर) असे ठार झालेल्या मजुराचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यात केबल टाकण्याचे काम करण्याकरिता नवेगाव येथून श्रीकांत सतरे हे आपल्या काही साेबत्यांसह आले हाेते. गडचिराेली वनविभागातील कुनघाडा रै. वन परिक्षेत्रांतर्गत आबापूर गाव परिसरातच हे काम सुरू हाेते. दरम्यान, २३ ऑक्टाेबर राेजी चातगाव व गडचिराेली वन परिक्षेत्रातून रानटी टस्कर हत्तीने कुनघाडा रै. वन परिक्षेत्रात प्रवेश केलेला हाेता. नियत क्षेत्र मुतनूर वनक्षेत्रातील आबापूर जंगलात टस्कर हत्ती वावरत असल्याची माहिती केबल टाकणाऱ्या मजुरांना मिळाली व त्यापैकी तिघेजण हत्ती पाहायला गुरुवारी सकाळीच गेले हाेते.
पळ काढल्याने वाचला दाेघांचा जीव
हत्ती दूरवरच असताना श्रीकांत हा हत्तीसोबत सेल्फी काढण्यात मग्न असतानाच हत्तीने हल्ला करून त्याला चिरडले. ताेपर्यंत अन्य दाेघेजण तेथून पळ काढत आपला जीव वाचविण्यात यशस्वी झाले. हे मजूर केबल टाकण्याचे काम करण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिराेली जिल्ह्यात आले हाेते.