शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचे देवदूत... डाव्या हाताला सलाईन, उजव्या हाताने प्रिस्किप्शन लिहिणारे डॉक्टर

By संजय तिपाले | Updated: July 16, 2024 13:33 IST

Gadchiroli : नक्षलग्रस्त लाहेरीत मलेरियाग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याची अशीही रुग्णसेवा

गडचिरोली : जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे उडणारे चित्र नेहमीच पाहावयास मिळते, पण प्रतिकूल परिस्थितीतही काही वैद्यकीय अधिकारी अतिदुर्गम व नक्षलप्रभावित भागात निष्ठेने रुग्णसेवा करुन आदिवासींसाठी देवदूत ठरत आहेत. याचा प्रत्यय १५ जुलैला भामरागड तालुक्यातील लाहेरीत आला. स्वत: मलेरियाग्रस्त असल्याने एका हाताला सलाईन असताना दुसऱ्या हाताने प्रिस्क्रिप्शन लिहून कर्तव्यपूर्ती करतानाचे एका वैद्यकीय अधिकाऱ्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

डॉ. संभाजी देवराव भोकरे असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. मूळचे हिंगोलीचे रहिवासी असलेले डॉ. भोकरे हे गेल्या काही वर्षांपासून भामरागडसारख्या अतिदुर्गम व नक्षलप्रभावित सेवा बजावत आहेत. सध्या त्यांची नियुक्ती लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे. गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक मलेरिया रुग्ण आहेत. भामरागड तालुका अधिक प्रभावित आहे. डॉ. भोकरे यांनाही मलेरियाचे निदान झाले. त्यामुळे १५ जुलै रोजी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातच स्वत:ला सलाईन लावून उपचार घेत होते. याचवेळी आदिवासी रुग्ण उपचारासाठी आले. यावेळी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून बाह्य रुग्ण कक्षात खुर्चीत बसून डाव्या हाताला सलाईन घेत असलेल्या डॉ. भोकरे यांनी उजव्या हाताने त्यांची तपासणी करुन प्रिस्क्रिप्शन लिहिले. स्वत: उपचार घेत असताना इतरांवर उपचार करणाऱ्या डॉ. भोकरे यांनी दाखवलेल्या तत्परतेची सध्या चर्चा आहे.

कधी झोळीतून, कधी नाल्यातून पायवाट...भामरागड तालुक्यात शेजारील छत्तीसगडचे काही रुग्ण झोळीतून तर कधी कावड करुन दवाखान्यात येत असतात. पक्के रस्ते नसल्याने काही ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचत नाहीत तर पावसाळ्यात नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. हे नेहमीचेच चित्र आहे. भामरागड तालुक्यातील लाहेरी ग्रामपंचायत अंतर्गत बंगाडी गावात तापेने फणफणाऱ्या मुलीला पित्याने खांद्यावर बसवून नाल्यातून वाट काढत आरोग्य केंद्रात आणल्याचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीच व्हायरल झाला होता. त्यावरुन एकीकडे आरोग्य सुविधांचा प्रश्न ऐरणीवर असताना डॉक्टरच्या सेवानिष्ठेचे दिलासादायक चित्र समोर आले आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरGadchiroliगडचिरोलीTrible Development Schemeआदिवासी विकास योजना