घातपातासाठी ठेवली स्फाेटकसदृश्य वस्तू; भटपारवासींनी नक्षल्यांना केली गावबंदी
By गेापाल लाजुरकर | Updated: June 20, 2024 21:58 IST2024-06-20T21:58:07+5:302024-06-20T21:58:16+5:30
नागरिकांचा विराेध : धाेडराज पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील घटना

घातपातासाठी ठेवली स्फाेटकसदृश्य वस्तू; भटपारवासींनी नक्षल्यांना केली गावबंदी
गडचिरोली : सुरक्षा रक्षक दलास नुकसान पाेहाेचविणे व घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने धाेडराज पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील भटपार येथे २० जून राेजी लाेखंडी टाेकदार सळाखी व स्फाेटकेसदृश्य वस्तू आढळून आल्या. सदर वस्तू गावकऱ्यांनी जमा करून पाेलिस ठाण्यात जमा करीत नक्षल्यांना गावबंदी करीत असल्याचा ठराव दिला.
धाेडराज पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भटपार गाव जंगल परिसरातील घोटपाडी पहाडीजवळ माओवाद्यांनी लोखंडी टोकदार सळाखी तसेच कुकरमध्ये ठेवलेल्या आयडी सदृश वस्तू, वायर व बॅटरी भटपार येथील नागरिकांनी स्वतःहून पोलिस स्टेशनला येऊन जमा केल्या व यासोबतच तेथील गावकऱ्यांनी माओवाद्यांना गावबंदी केल्याचा ठराव धोडराजचे प्रभारी अधिकारी अमाेल सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केला. ही कारवाई भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनात पार पाडण्यात आली.
यापूर्वी सात गावांनी केली बंदी
धोडराज पाेलिस स्टेशन हद्दीतील सात गावातील नागरिकांनी १४ जून राेजी माओवाद्यांना गावबंदी केल्याचा ठराव पाेलिस ठाण्याकडे सादर केला होता. आता पुन्हा एका गावाची भर यात पडली आहे.
अतिदुर्गम भागातील नागरिकांनी माओवाद्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता स्वत:च्या व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे. जिल्हा पोलिस दल सदैव नागरिकांच्या पाठीशी आहे. जिल्ह्यास माओवादमुक्त करण्यात अशाच प्रकारची मदत करावी.
- नीलाेत्पल, पाेलिस अधीक्षक