चाचणी करणाऱ्यांपैकी ९.४४ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 05:00 IST2020-11-19T05:00:00+5:302020-11-19T05:00:21+5:30
र`पिड अँटिजन टेस्टपेक्षा आरटीपीसीआर टेस्ट जास्त खात्रीशिर आणि अचूक निदान करणाऱ्या असल्याचे मानले जाते. त्यामुळे ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत पण र`पिड टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला त्यांची पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करून खात्री केली जाते. र`पिड टेस्टचा निरोर्ट निगेटिव्ह आलेल्या अनेक रुग्णांचा आरटीपीसीआर रिपोर्ट मात्र पॉझिटिव्ह आला आहे.

चाचणी करणाऱ्यांपैकी ९.४४ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण गेल्या १५ दिवसात थोडे कमी झाल्याचे दिसत आहे. पण ही कोरोनारुग्णांची संख्या घटन्यामागे दिवाळी सणाचे निमित्त कारणीभूत ठरत आहे. लोक चाचण्या करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे खरी रुग्णसंख्या समोर येण्यास अडचण निर्माण झाली आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या कोरोनाच्या चाचण्यांमध्ये ९.४४ टक्के रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे र`पिड अँटिजन टेस्टपेक्षा आरटीपीसीआर टेस्टमधून पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण जास्त आहे.कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यापासून जिल्हाभरातील कोविड रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रॅपिड अँटिजन चाचण्या करण्यासाठी सुविधा देण्यात आली. काही मिनिटात रिपोर्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे कळत असल्याने आरोग्य विभागासाठीही सदर टेस्ट किट अधिक सोयीस्कर ठरत आहे. आजघडीला सरासरी दररोज २५० ते ३०० र`पिड टेस्ट केल्या जात आहेत. आतापर्यंत ५५ हजार ९६९ र`पिड टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी ४८६६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ५१ हजार ९३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
गेल्या महिन्यात १९ ऑक्टोबरला गडचिरोलीत आरटीपीसीआर प्रयोगशाळेला सुरूवात झाली. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी रिपोर्ट मिळणे सुरू झाले. त्यापूर्वी नमुने नागपूरला तपासणीसाठी पाठवावे लागत असल्याने वेळ लागत होता. सध्या दिवाळी सणानिमित्त लोक घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रवासही वाढला आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
आरटीपीसीआर रिपोर्टमध्ये ४२ टक्के पॉझिटिव्ह
र`पिड अँटिजन टेस्टपेक्षा आरटीपीसीआर टेस्ट जास्त खात्रीशिर आणि अचूक निदान करणाऱ्या असल्याचे मानले जाते. त्यामुळे ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत पण र`पिड टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला त्यांची पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करून खात्री केली जाते. र`पिड टेस्टचा निरोर्ट निगेटिव्ह आलेल्या अनेक रुग्णांचा आरटीपीसीआर रिपोर्ट मात्र पॉझिटिव्ह आला आहे.
गडचिरोलीत आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत १२८५ टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी ५४० म्हणजे ४२ टक्के रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर ६५१ रिपोर्ट निगेटिव्ह आले. ८७ टेस्टमध्ये योग्य निदान करणे शक्य झाले नसल्यामुळे त्यांचे स्व`ब नमुने पुन्हा घेण्यात आले.
दिवाळी सणानिमित्त मार्केटमध्ये, प्रवासाला जाताना मास्क, फिजिकल डिस्टन्स यासारख्या नियमांचे नागरिकांनी कडक पालन करावे. अन्यता डिसेंबर महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत केलेल्या सर्वेक्षणात मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची नोंद आम्ही घेतली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा त्यांच्या संपर्कात असते. पण कोणीही कोरोनाची थोडी लक्षणे दिसत असल्यास ती वाढण्याची वाट न पाहता कोरोना टेस्ट करावी.
- डॉ.सुनील मडावी, प्र.जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली