९ इमारती पूर्ण, ७ बांधकाम प्रगतीपथावर
By Admin | Updated: April 26, 2017 01:07 IST2017-04-26T01:07:03+5:302017-04-26T01:07:03+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शालेय इमारत व मुला/मुलींचे वसतिगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे.

९ इमारती पूर्ण, ७ बांधकाम प्रगतीपथावर
आदिवासी विकास विभाग : गडचिरोली प्रकल्पात २२ शाळा इमारती व ११ वसतिगृहाचे बांधकाम
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शालेय इमारत व मुला/मुलींचे वसतिगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत ११ शाळा इमारती व ११ वसतिगृह बांधकाम करण्यात आले. त्यातील ९ इमारती पूर्ण झाल्या असून ७ इमारतींचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी ए. आर. शिवणकर यांनी लोकमतला दिली आहे.
गडचिरोली प्रकल्पाअंतर्गत सोनसरी, कोटगूल, रांगी, मुरूमगाव, पेंढरी, इंग्रजी माध्यमिक शाळा गडचिरोली येथे शाळा इमारती बांधण्यात आल्या. सध्या भाकरोंडी व अंगारा येथील शाळा इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. इमारत हस्तांतरणाचे काम बाकी आहे. तर सावरगाव, रेगडी, मार्र्कंडादेव येथील इमारती बांधकाम प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती शिवणकर यांनी दिली आहे. तसेच या प्रकल्पाअंतर्गत ११ वसतिगृह इमारती बांधण्यात आल्या. यामध्ये मसेली, अंगारा, मार्र्कंडा, मसेली, गॅरापत्ती, कारवाफा, गॅरापत्ती येथील इमारतींचा समावेश आहे. या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु हस्तांतरण झालेले नाही. तसेच कुरूंडी माल, सोडे, येंगलखेडा येथीलही बांधकामही प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
शैक्षणिक सत्र २०१५-१६ पासून मुरूमगाव येथे आश्रमशाळा इमारतीचे बांधकाम सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. सोडे आश्रमशाळेत जनरेटर व फिल्टर बंद असल्याची बाब आदिवासी विकास विभागाने मान्य केली असून संपूर्ण महाराष्ट्रात आश्रमशाळाकरिता खरेदी करण्यात आलेल्या वॉटर फिल्टर, जनरेटर, सोलर वॉटर हिटर, बायोमेट्रिक मशीन यांच्या खरेदीकरिता निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. खरेदीची चौकशी करून यासंदर्भातील अहवाल शासनास सादर व्हायचा आहे. त्यामुळे खरेदी केलेल्या साहित्याची दुरूस्ती करता येत नाही. त्यामुळे सोडे व इतर आश्रमशाळातील वॉटर फिल्टर, जनरेटर, वॉटर हिटर यांची दुरूस्ती प्रलंबित राहिलेली आहे, अशी माहिती सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) विनोद कुळकर्णी यांनी दिली आहे. लोकमतमध्ये १९ एप्रिल रोजी सावगाव शाळेच्या इमारतीसंदर्भात आलेल्या वृत्ताच्या स्पष्टीकरणात त्यांनी सदर माहिती दिली आहे.