८९ हजार तरुणांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST2021-07-21T04:24:53+5:302021-07-21T04:24:53+5:30
बाॅक्स .... महिनाभरात सर्वाधिक लसीकरण १ मेपासून १८ ते ४४ या वयाेगटाला लस देण्यास सुरुवात झाली. मात्र १५ दिवसांतच ...

८९ हजार तरुणांनी घेतली लस
बाॅक्स ....
महिनाभरात सर्वाधिक लसीकरण
१ मेपासून १८ ते ४४ या वयाेगटाला लस देण्यास सुरुवात झाली. मात्र १५ दिवसांतच या वर्गाचे लसीकरण बंद करण्यात आले. त्यानंतर २१ जूनपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात जेमतेम तीन हजार नागरिकांनी लस घेतल्या हाेत्या. त्यानंतर २१ जूनपासून जवळपास ८५ हजार नागरिकांनी लस घेतली आहे.
बाॅक्स.....
तीन लाखांचा टप्पा केला पार
नागरिकांमध्ये काेराेना लसविषयी आता बऱ्यापैकी जागृती झाली असल्याने नागरिक स्वत:हून लस घेण्यास तयार असल्याचे दिसून येत आहे. १९ जुलैपर्यंत दोन लाख ५७ हजार ८४२ नागरिकांना पहिला डाेस, तर ५० हजार ४८० दुसरा डाेस देण्यात आला आहे.
बाॅक्स .......
आता काेव्हॅक्सिनचा पुरवठा
सुरुवातीच्या कालावधीत गडचिराेली जिल्ह्याला काेविशिल्ड या लसीचा सर्वाधिक पुरवठा केला जात हाेता. आता काेव्हॅक्सिन ही लस दिली जात आहे. केवळ दुसऱ्या डाेससाठीच काेविशिल्ड ही लस उपलब्ध करून दिली जात आहे.
बाॅक्स ...
वयनिहाय लसीकरण
गट पहिला डाेस दुसरा डाेस
हेल्थवर्कर ९,६०३ ७,९०८
फ्रंटलाइन वर्कर २४,१२४ १३,२७४
१८ ते ४४ ८८,४०६ २,९५६
४५ ते ६० ८२,४५९ १४,६७६
६० वर्षांपुढील ५३,२५० ११,६६६
एकूण २,५७,४८२ ५०,४८०
...........................................
पुरुष - १,६६,१७६
महिला - १,४६,३४७