शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

८८.१२ हे.आर. जागा संपादित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 22:26 IST

जिल्ह्यातील वडसा-गडचिरोली जिल्ह्यातील ५२ किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेस वेग आला आहे. या रेल्वे मार्गासाठी ८८.१२५६ हेक्टर आर. जागा संपादित केली जाणार आहे.

ठळक मुद्देवडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग : भूसंपादन प्रक्रियेला वेग येणार; आक्षेपकर्त्यांच्या जमिनीची पुनर्मोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : जिल्ह्यातील वडसा-गडचिरोली जिल्ह्यातील ५२ किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेस वेग आला आहे. या रेल्वे मार्गासाठी ८८.१२५६ हेक्टर आर. जागा संपादित केली जाणार आहे. त्यामुळे सदर रेल्वे मार्गाच्या निर्मितीच्या प्रक्रियेला नव्याने वेग येणार आहे, अशी माहिती महसूल विभागाकडून प्राप्त झाली आहे.५ जानेवारी २०१६ च्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वडसा-गडचिरोली नवीन रेल्वे लाईन करिता देसाईगंज उपविभागातील जमीन संपादन करण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या कार्यालयाचे उद्घोषण क्रमांक कावि/उविअ/अका-२/२३६३/२०१७ दि.२५ सप्टेंबर २०१७ नुसार देसाईगंज उपविभागातील १६ गावातील ४३६ सर्व्हे नंबर व एकूण क्षेत्र ८८.१२५६ हेक्टर आर. खासगी जमीन वडसा-गडचिरोली नवीन रेल्वे लाईन करिता वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने खरेदी करण्याकरिता उद्घोषना १४ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. उद्घोषनामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जमिनीपैकी काही जमीनधारकांनी त्यांचे जमीन संपादन होत असलेल्या क्षेत्राबाबत उपरोक्त कार्यालयात आक्षेप नोंदविला होता. त्या अनुषंगाने आक्षेपकर्त्यांचे उपस्थितीत त्यांच्या जमिनीची पुनर्मोजणी करण्यात आली होती.उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी देसाईगंज यांच्या उपविभागातील देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील शासन परिपत्रक २५ जानेवारी २०१७ च्या परिच्छेद ४ मध्ये नमूद असलेल्या पुनर्मोजणी केलेल्या संयुक्त मोजणी अहवालानुसार सुधारित परिशिष्ट २ मध्ये दर्शविल्या प्रमाणे नऊ गावातील आक्षेप होते. एकूण १६४ सर्व्हे नंबरच्या क्षेत्रामध्ये वडसा-गडचिरोली नवीन रेल्वे लाईन करिता खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने खरेदी करण्याकरिता झालेल्या बदलाबाबतचे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार जमीन खरेदीची प्रक्रिया पार पडणार आहे. याकामी प्रक्रिया सुरू आहे.यापूर्वी १४ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या व सुधारित परिशिष्ट २ मध्ये नसणाºया सर्व्हे नंबरमध्ये कोणताही बदल झाला नसल्याचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांनी सदर प्रतिनिधीस सांगितले.पुराव्यासह तक्रार नोंदविण्याचे एसडीओंचे आवाहनसुधारित परिशिष्ट-२ मधील जमिनीवर इतर कुणाचाही हक्क, हितसंबंध, बोजा, सोसायटी कर्ज, बँक कर्ज, गहाण, बक्षीस अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण किंवा भू.क्र.बाबत कोर्टात मालकीहक्क किंवा अनुषंगिक दाद मागितली असल्यास आणि कोणाची उजरतक्रार, आक्षेप असल्यास जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी देसाईगंज यांच्याकडे कागदपत्राच्या पुराव्यानिशी आपली तक्रार नोंदविण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांनी केले आहे. विहीत मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झाल्यास संबंधित जमिनीवर कोणचीही तक्रार नाही, असे गृहित धरून संयुक्त मोजणीनुसार तलाठी अभिलेख व शोध अहवालानुसार जमिनीचे मालक हक्क निश्चित करून शेतजमिनीची खासगी वाटाघाटीने सरळ खरेदी करण्याची कारवाई करण्यात येईल व त्यानंतर शेतजमिनीच्या मालकी हक्क संबंधात अथवा इतर कोणत्याही बाबीसंबंधात काही वाद उपस्थित झाल्यास शासन जबाबदार राहणार असेही उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेGadchiroliगडचिरोली