८१ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शनावर रवाना
By Admin | Updated: August 26, 2016 01:07 IST2016-08-26T01:07:25+5:302016-08-26T01:07:25+5:30
पोलीस विभागामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांची महाराष्ट्र दर्शन सहलीची १३ वी फेरी गुरूवारी गडचिरोली येथून रवाना करण्यात आली.

८१ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शनावर रवाना
१३ वी फेरी : पोलीस अधीक्षक उपस्थित
गडचिरोली : पोलीस विभागामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांची महाराष्ट्र दर्शन सहलीची १३ वी फेरी गुरूवारी गडचिरोली येथून रवाना करण्यात आली. या फेरीमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच तब्बल ८१ मुलामुलींचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या सहलीला हिरवी झेंडी दाखवून विद्यार्थ्यांना रवाना केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, सहलीत सहभागी झालेल्या दुर्गम आदिवासी भागातील मुलांसोबत नक्षल पीडित, नक्षल कुटुंबीयातील पाल्यांचाही सहभाग आहे. सहलीतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक प्रगतीचा अभ्यास करून त्याचा उपयोग गडचिरोली जिल्ह्याला वैभवसंपन्न बनविण्यासाठी करावा, तसेच सहलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना केले. या सहलीसोबत पोलीस निरिक्षक मंडलवार, महिला पोलीस उपनिरिक्षक समू चौधरी व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक पाठविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)