८१ कोरोनामुक्त तर ४५ नवीन कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST2021-06-05T04:26:33+5:302021-06-05T04:26:33+5:30
एकूण काेराेना बाधितांची संख्या २९ हजार ५४८ एवढी झाली आहे. त्यापैकी २८ हजार २७४ जणांनी काेराेनावर मात केली आहे. ...

८१ कोरोनामुक्त तर ४५ नवीन कोरोना बाधित
एकूण काेराेना बाधितांची संख्या २९ हजार ५४८ एवढी झाली आहे. त्यापैकी २८ हजार २७४ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ५५१ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ७२३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६९ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण १.८६ टक्के तर मृत्यू दर २.४५ टक्के झाला. नवीन ४५ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ९, अहेरी तालुक्यातील २, आरमोरी ९ भामरागड तालुक्यातील ३, चामोर्शी १३, धानोरा २, मुलचेरा १, सिरोंचा १ तर देसाईगंज तालुक्यातील बाधितामध्ये ५ जणांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या ८१ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील १९, अहेरी ४, आरमोरी ४, भामरागड १, चामोर्शी १५, धानोरा ४, एटापल्ली ५, मुलचेरा १०, सिरोंचा ३, कोरची २, कुरखेडा २ तसेच देसाईगंज तालुक्यातील १० जणांचा समावेश आहे.