८०० व्यक्तींचा नेत्रदानाचा संकल्प
By Admin | Updated: September 6, 2015 01:18 IST2015-09-06T01:18:04+5:302015-09-06T01:18:04+5:30
जिल्हा अधंत्त्व निवारण समिती ग्रामीण रूग्णालय, महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालय, राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना ...

८०० व्यक्तींचा नेत्रदानाचा संकल्प
पंधरवडा कार्यक्रम : नेत्रदान करण्याबाबत केले मार्गदर्शन
आष्टी : जिल्हा अधंत्त्व निवारण समिती ग्रामीण रूग्णालय, महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालय, राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना पथक यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदान पंधरवडाचे औचित्य साधून बुधवारी नेत्रदान जनजागृती मार्गदर्शन व संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान सुमारे ८०० जणांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा देशमुख होत्या. प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे नेत्र शल्य चिकित्सक डॉ. किरण मडावी, पोलीस उपनिरिक्षक एन. बी. गोहणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल धात्रक, प्राचार्य संजय फुलझेले, प्राचार्य एम. यु. उरकुडे आदी मान्यवर उपस्थित होते. २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान आयबँक असोसिएशन आॅफ इंडिया तथा स्वास्थ व परिसर कल्याण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडाचे आयोजन केले जाते. यानिमित्त नेत्रदान जनजागृती व संकल्प दिन पाळला जातो.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. किरण मडावी यांनी नेत्रदानाची गरज, नेत्रदान कोण करू शकतो, नेत्रदानाचे महत्त्व याबाबत माहिती दिली. प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करावा, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान ८०० नागरिकांनी नेत्रदान करण्याविषयीचा संकल्प अर्ज भरून दिला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. रमेश पोटवार यांनी केले. संचालन प्रा. डॉ. भारत पांडे तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी एच. जी. तागडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. रवी शास्त्रकार, प्रा. एन. एस. बोरकुटे, प्रा. गणेश खुणे, प्रा. पोरटे, प्रा. गजभिये, प्रा. सुनिल धोंगडे, प्रा. एन. जे. साजुरकर, प्रा. अनिता नलोडे, प्रा. लाडे, जी. एस. खाडे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)