अजूनही ८० टक्के बाजारपेठ बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 05:00 AM2020-05-08T05:00:00+5:302020-05-08T05:01:04+5:30

जिल्ह्यात अडकून पडलेल्या बाहेरच्या जिल्ह्यातील आणि राज्यातील नागरिकांना त्यांच्या गृहजिल्ह्यात रवाना केल्यानंतर बाहेर अडकून पडलेले या जिल्ह्यातील बहुतांश नागरिक आता आपापल्या गावात दाखल झाले आहेत. त्या सर्वांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवून तर काहींना घरीच विलगिकरणात राहण्यास सांगून गाव समित्यांमार्फत त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे हे नागरिक १४ दिवसपर्यंत बाहेर भटकण्याची शक्यता नाही.

80% of the market is still closed | अजूनही ८० टक्के बाजारपेठ बंदच

अजूनही ८० टक्के बाजारपेठ बंदच

Next
ठळक मुद्देनागरिकांसह व्यापारीही हतबल : व्यवसायानुसार ठराविक दिवस वाटून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोना संसर्गाच्या बाबतीत राज्यभरातील ग्रिन झोनमध्ये असलेल्या मोजक्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश आहे. असे असले तरी गेल्या सव्वा महिन्यापासून येथील बाजारपेठेसह प्रमुख व्यवहार ठप्पच आहेत. दुसरे लॉकडाऊन संपल्यानंतर (३ मे नंतर) जिल्ह्यातील बहुतांश व्यवहार सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना प्रत्यक्षात ८० टक्के बाजारपेठ बंदच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तमाम नागरिकांसह व्यापारी वर्गही हतबल होऊन संभ्रमात पडला आहे.
जिल्ह्यात अडकून पडलेल्या बाहेरच्या जिल्ह्यातील आणि राज्यातील नागरिकांना त्यांच्या गृहजिल्ह्यात रवाना केल्यानंतर बाहेर अडकून पडलेले या जिल्ह्यातील बहुतांश नागरिक आता आपापल्या गावात दाखल झाले आहेत. त्या सर्वांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवून तर काहींना घरीच विलगिकरणात राहण्यास सांगून गाव समित्यांमार्फत त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे हे नागरिक १४ दिवसपर्यंत बाहेर भटकण्याची शक्यता नाही. विशेष म्हणजे सर्व स्तरातील नागरिकांमध्ये आता बऱ्यापैकी कोरोनाची जागृती आल्यामुळे हातावर शिक्का मारलेल्या व्यक्तीला बाहेर भटकताना दिसल्यास नागरिक स्वत:च त्याला मनाई करतील. अशा स्थितीत बाजारपेठ टप्प्याटप्प्याने उघडल्यास बाहेरून आलेल्या व्यक्तीपासून इतरांना धोका होण्याची शक्यता राहणार नाही. तसेच बºयाच प्रमाणात नागरिकांना दिलासाही मिळू शकेल.
विशेष म्हणजे ग्रीन झोन असलेल्या लगतच्या गोंदिया जिल्ह्यात बºयापैकी व्यवहार सुरू झाले आहेत. किराणा दुकाने वगळता बाजारपेठेतील इतरही दुकानांना तिथे परवानगी देण्यात आली. कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतरही तिथे बाजारपेठ सुरू होऊ शकते, तर गडचिरोलीत का नाही? असा प्रश्न देसाईगंज येथील व्यापारी तथा माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना निवेदन सादर केले.
दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील बाजारपेठ ४ दिवसात सुरू करण्याचे सूतोवाच केले होते. परंतू अजून त्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने आदेश काढण्यात आलेला नाही. अशाही स्थितीत काही दुकानदारांनी अर्धवट शटर उघडून काही प्रमाणात व्यवहार सुरू केले आहेत. परवानगी आहे किंवा नाही याबाबत अनेक जण संभ्रमात आहेत.

व्यवहार एकमेकांवर अवलंबून
जिल्हा प्रशासनाने बांधकामांसह काही व्यवहारांना परवानगी दिली आहे. परंतू त्या कामासाठी लागणाºया साहित्यांची दुकाने बंद आहेत. केवळ किराणा माल, औषधी, कृषी साहित्य, विद्युत उपकरणे यांनाच परवानगी दिली आहे. पण दैनंदिन जीवनात याशिवाय अनेक बाबींची गरज पडत असताना ती दुकाने कधी सुरू करणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अनेक व्यवहार एकमेकांवर अवलंबून आहेत. त्या साखळीतील इतर दुकाने बंद असल्याने अनेक कामे अडून पडली आहेत.

व्यवसायानुसार करा दिवसांची वाटणी
मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या व्यवसायाला विशिष्ट दिवशीच सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यास कामेही अडणार नाही आणि गर्दीही टाळणे शक्य होऊ शकेल. याशिवाय सर्वच व्यापारी, त्यांचे नोकरदार यांचीही मिळकत सुरू होऊन अर्थव्यवस्थेची घडी निट बसण्यास मदत होईल.

Web Title: 80% of the market is still closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार