आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्तारूढ गटाचे आठ उमेदवार अविरोधचुरस संपली : खिळसागर नाकाडे, मुकेश वाघाडे व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 01:11 IST2017-04-24T01:11:04+5:302017-04-24T01:11:04+5:30
विदर्भातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी असलेल्या आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्तारूढ गटाचे आठ उमेदवार अविरोधचुरस संपली : खिळसागर नाकाडे, मुकेश वाघाडे व
रत्नाकर धाईत यांची अविरोध निवड
गडचिरोली : विदर्भातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी असलेल्या आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. मागील ५० वर्षांपासून या बाजार समितीवर वर्चस्व ठेवणाऱ्या सत्तारूढ गटाचे आठ जागांवर उमेदवार अविरोध निवडून आले आहेत.
आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात आरमोरी, वडसा, कुरखेडा, कोरची हे तालुके येतात. निवडणुकीत सहकारी संस्था मतदार संघातून इतर मागासवर्ग प्रवर्गातून विद्यमान मुख्य प्रशासक खिळसागर नाकाडे व विमुक्त जाती प्रवर्गातून रत्नाकर धाईत हे दोन उमेदवार अविरोध निवडून आले आहे. सहकार मतदार संघात एकूण ११ उमेदवार निवडून द्यावयाचे होते. त्यात दोन उमेदवार अविरोध निवडून आले. सत्तारूढ गटातून आता नऊ उमेदवार मैदानात आहे. त्यामध्ये व्यंकटी नागीलवार, हरीचंद्र डोंगरवार, दोषहर फाये, रामसू काटेंगे, ईश्वर पासेवार, देवाजी पिल्लारे, खेमराज हुलके, ललिता टिकले, कलावती कानतोडे यांचा समावेश आहे. तर याच गटात विरोधी आघाडीकडून ग्यानबा हारगुडे, ईश्वर खोडवे, आसाराम प्रधान, सरस्वती कांबळी या मैदानात आहेत. या गटात सत्ताधाऱ्यांचे पाच उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून सत्तारूढ गटाकडून दुर्बल घटक प्रवर्गातून मुकेश वाघाडे निवडून आलेत आहेत. तर याच गटात अनुसूचित जाती मतदार संघातून सत्तारूढ गटातर्फे पुष्पलता मासरकर तर विरोधी गटाकडून दामोधर वट्टी मैदानात आहे. ग्रामपंचायत मतदार संघाच्या सर्वसाधारण गटात सत्तारूढ गटाकडून कैलाश राणे, विनोद खुणे तर विरोधी गटाकडून चंदू गरफडे, सुजित मिस्त्री यांच्यासह कवडू सहारे, तुलाराम मडावी व दादाजी भर्रे हे निवडणूक लढत आहे. येथे विरोधी गटाला एकमत करून उमेदवार देता आले नाही. त्यामुळे या गटात विरोधकांच्याच उमेदवारांचा अधिक भरणा आहे. व्यापारी मतदार संघातून सत्तारूढ गटातर्फे हैदरभाई पंजवानी, गुरूमुखदास नागदेवे हे रिंगणात आहे. त्यांची लढत विरोधी गटाकडून मैदानात असलेले माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी व दादाजी ठेंगरी यांच्यासोबत आहे. हमाल - मापारी मतदार संघातून सत्तारूढ गटातर्फे दौलत ठाकरे, तर विरोधी गटातर्फे नवलाजी ठाकरे यांच्यात लढत आहे. १८ पैकी आठ जागांवर सत्तारूढ गटाचे उमेदवार अविरोध निवडून आल्याने या निवडणुकीतली चुरस आता संपल्यासारखी आहे. त्यामुळे राजकीय वातावरण फारसे तापलेले दिसून येत नाही. ७ मे रोजी या बाजार समितीसाठी विविध केंद्रांवर मतदान होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)