७३७ नागरिकांना मिळाला लाभ
By Admin | Updated: January 24, 2016 01:12 IST2016-01-24T01:12:22+5:302016-01-24T01:12:22+5:30
येथील उपजिल्हा रूग्णालयात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, उपजिल्हा रूग्णालय, सत्य सामाजिक संस्था देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

७३७ नागरिकांना मिळाला लाभ
अहेरीत आरोग्य शिबिर : १२८ रूग्णांवर शस्त्रक्रिया होणार
अहेरी : येथील उपजिल्हा रूग्णालयात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, उपजिल्हा रूग्णालय, सत्य सामाजिक संस्था देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ७३७ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. १२८ रूग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून त्यांना २७ व ३० जानेवारीला शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथील खासगी रूग्णालयात पाठविले जाणार आहे. मूत्रपिंड व मूत्रमार्ग आजार, कॅन्सर, फॅक्चर, स्त्रीरोग, स्तन व गर्भाशय आजार, लकवा, लहान मुलांचे आजार, जठर व आतडेची शस्त्रक्रिया यासारख्या वेगवेगळ्या आजाराचे तपासण्या व आवश्यक शस्त्रक्रिया या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी अहेरी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे जिल्हा प्रमुख लिलाधर धाकडे, देवेंद्र गणवीर, राहूल राऊत, मनिष तिवारी आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)