७३ टक्के मतदान

By Admin | Updated: May 1, 2015 01:27 IST2015-05-01T01:27:11+5:302015-05-01T01:27:11+5:30

दुसऱ्या टप्प्यातील आठ तालुक्यातील २३९ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व दोन ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीसाठी गुरूवारी तगड्या पोलीस बंदोबस्तात...

73 percent voting | ७३ टक्के मतदान

७३ टक्के मतदान

गडचिरोली : दुसऱ्या टप्प्यातील आठ तालुक्यातील २३९ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व दोन ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीसाठी गुरूवारी तगड्या पोलीस बंदोबस्तात एकूण ७१२ केंद्रांवरून सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाची सरासरी टक्केवारी ७३ आहे.
गडचिरोली तालुक्यात ८३.१६ टक्के मतदान झाले. कुरखेडा तालुक्यात ८२.६७, कोरची तालुक्यात ७२.९२, देसाईगंज तालुक्यात ८४.९९, आरमोरी तालुक्यात ८०, धानोरा तालुक्यात ७५, मुलचेरा तालुक्यात ७९.४१ व चामोर्शी तालुक्यात ८० टक्के सरासरी मतदान झाले.
मतदान आटोपल्यानंतर धानोरा तालुक्यातील पेंढरी व पयडी ग्रा.पं. निवडणुकीच्या मतदान केंद्रावरील इव्हीएम मशीन हेलिकॉप्टरने धानोरा तालुका मुख्यालयात आणण्यात आल्या. चामोर्शी तालुक्यातील रेगडी मतदान केंद्रावर सहायक फौजदार तुळशीदास रामटेके, पोलीस शिपाई शिवदास दुर्गे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे उपचारासाठी आणण्यात आले.

Web Title: 73 percent voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.