७० नागरिकांनी केले रक्तदान

By Admin | Updated: October 11, 2014 23:09 IST2014-10-11T23:09:05+5:302014-10-11T23:09:05+5:30

नाभिक समाज संघटना व संत नगाजी देवस्थान यांच्यावतीने संत नगाजी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरादरम्यान सुमारे ७० नागरिकांनी

70 people donated blood donation | ७० नागरिकांनी केले रक्तदान

७० नागरिकांनी केले रक्तदान

गडचिरोली : नाभिक समाज संघटना व संत नगाजी देवस्थान यांच्यावतीने संत नगाजी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरादरम्यान सुमारे ७० नागरिकांनी रक्तदान केले. त्याचबरोबर इतरही अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
घटस्थापना करून संत नगाजी महाराज यांच्या पुण्यतिथी समारंभाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मधूकर सूर्यवंशी, मोतीराम सूर्यवंशी, संघटनेचे अध्यक्ष नामदेव कवडू फुलबांधे, खुशरंग शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिराला डॉ. पंकज सकीणलावार, थामदेव महागनवार, संदीप लांजेवार, मनोज कोपावार, क्रिष्णा सायरनवार आदी मान्यवर उपस्थित होते.
संत नगाजी महाराज यांची जयंती केवळ धार्मिक कार्यक्रमांनीच साजरी न करता यानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे दरवर्षीच आयोजन करण्यात येते. यावर्षी रक्तदान शिबिर घेण्यात आला. या शिबिराला समाजातील युवक, महिला व नाभिक समाजातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दर्शविला. सुमारे ७० रक्दात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने नरेंद्र पोवनवार, विवेक महागमवार, सागर होकम, राकेश वाटेकर, सोमकांत कटुकार, सुधाकर कतलपवार, थामदेव महागनवार, संदीप लांजेवार, सचिन सूत्रपवार, रामचंद्र सायलवार, कृष्णा सायरनवार, विनोद मादेशवार, अल्का क्षीरसागर, सुरेंद्र नक्षिणे, महेश जेट्टीवार आदींनी रक्तदान केले.
रक्तदानानंतर रक्तगट तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर बहुसंख्य नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणी कार्यक्रमादरम्यान डॉक्टरांनी नागरिकांना चांगले व निरोगी आरोग्य राखण्यासाठी सल्ला दिला. काही नागरिकांना औषधोपचारही सुचविण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. पंकज सकीणलावार, निशाली भरणे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ वागुलकर, प्रमोद दशमुखे, बंडू कुंभारे यांनी रुग्णांची तपासणी केली. पुण्यतिथीनिमित्त भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गोपालकाला केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव शेन्डे, देवीदास वाडेकर, मोतीराम सूर्यवंशी, मनोहर लांजेवार, रमेश नक्षीणे, खुशरंग शेन्डे आदी मान्यवर उपस्थित होते. समाजाचे अध्यक्ष नामदेव शेन्डे यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, समाजाचे आपल्यावर देणे आहे, हे देणे समाजकार्य करून फेडले पाहिजे, असे आवाहन केले.
प्रास्ताविक संदीप लांजेवार, संचालन व आभार थामदेव महागनवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी व्यंकटेश कल्याणमवार, सुधाकर कतलपवार, रमेश भंडारे, हेमराज लांजेवार, गिरीधर कडुकर, योगेश लांजेवार, बाळा लांजेवार, दिलीप कौशिक, संजय कतलपवार, अरूण नक्षिणे, बाबुराव वनस्कर, पुंडलिक सूर्यवंशी, अनिल कडुकर, सुरेश फुलबांदे, नामदेव इजनकर, राजेश जामदाडे, नीलकंठ मेश्राम आदींनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 70 people donated blood donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.