शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११४ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
3
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
4
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
5
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
6
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
7
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
8
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
9
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
10
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
11
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
12
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
13
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
14
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
15
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
16
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
17
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
18
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
19
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
20
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
Daily Top 2Weekly Top 5

७९ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:26 IST

महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवैध खनन व वाहतुकीसंबंधात रेती घाटावर तसेच मुरूमाच्या खाणीच्या परिसरात धाडसत्र राबवून सन २०१७-१८ या वर्षभरात एकूण ६६६ प्रकरणे निकाली काढले आहेत.

ठळक मुद्देवर्षभरातील कारवाई : अवैध खनन व वाहतुकीची ६६६ प्रकरणे निकाली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवैध खनन व वाहतुकीसंबंधात रेती घाटावर तसेच मुरूमाच्या खाणीच्या परिसरात धाडसत्र राबवून सन २०१७-१८ या वर्षभरात एकूण ६६६ प्रकरणे निकाली काढले आहेत. या प्रकरणातून संबंधीत तस्करांकडून एकूण ७९ लाख ११ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने दरवर्षी रेती घाटाची लिलाव प्रक्रिया राबविले जाते. या लिलाव प्रक्रियेतून प्रशासनामार्फत शासनाला कोट्यवधीचा महसूल प्राप्त होत असतो. मात्र सदर लिलाव प्रक्रियेत सहभागी न होताही काही तस्कर रेतीची अवैधरित्या वाहतूक करतात. तसेच काही कंत्राटदार क्षमतेपेक्षा व टीपीपेक्षा अधिक रेतीचे खनन करतात. अशा कंत्राटदाराविरोधात धडक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात प्रत्येक तालुकास्तरावर पथक गठीत करण्यात आले आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी हे विविध भागातील रेती घाटावर धाडसत्र राबवून संबंधित कंत्राटदाराकडून दंड वसूल करतात.गडचिरोली उपविभागात समाविष्ट असलेल्या गडचिरोली तालुक्यात अवैध खनन व वाहतुकीचे एकूण ११० प्रकरणे निकाली काढण्यात आले. याप्रकरणातून वर्षभरात १७ लाख २४ हजार ९६० रूपयांचा दंड महसूल अधिकाऱ्यांनी वसूल केला आहे. धानोरा तालुक्यात १३ प्रकरणे निकाली काढून १ लाख २० हजार १६० रूपयांचा दंड कंत्राटदाराकडून वसूल करण्यात आला आहे. गडचिरोली उपविभागात एकूण १२३ प्रकरणांच्या माध्यमातून ११ लाख ४५ हजार १२० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. चामोर्शी उपविभागात मुलचेरा व चामोर्शी या दोन तालुक्याचा समावेश आहे. चामोर्शी तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांनी ११२ प्रकरणे निकाली काढून १ लाख ५८ हजार ६८० रूपयांचा दंड वसूल केला आहे. मुलचेरा तालुक्यातील अधिकाऱ्यांनी ३९ प्रकरणातून २ लाख ६१ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. चामोर्शी उपविभागात एकूण १५१ प्रकरणातून १८ लाख ४१ हजार ६८० रूपयांचा दंड वर्षभरात वसूल केला आहे. देसाईगंज उपविभागात आरमोरी व देसाईगंज तालुक्याचा समावेश असून या उपविभागात एकूण १८१ प्रकरणातून १९ लाख ५६ हजार २०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कुरखेडा उपविभागात कोरची व कुरखेडा तालुक्याचा समावेश असून या उपविभागात ११० प्रकरणातून ६ लाख ८८ हजार ९०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.देसाईगंज उपविभाग आघाडीवरसन २०१७-१८ या वर्षात देसाईगंज उपविभागाने जिल्ह्यात सर्वाधिक १८१ प्रकरणे निकाली काढून १९ लाख ५६ हजार २०० दंड महसूल अधिकाऱ्यांनी वसूल केला आहे. त्याखालोखाल चामोर्शी उपविभागाने १५१ प्रकरणे निकाली काढून १८ लाख ४१ हजार ६८० रूपयांचा दंड वसूल केला आहे. त्यानंतर गडचिरोली उपविभागाने अवैध खनन व वाहतुकीच्या बाबत चांगली कारवाई केली आहे. सन २०१७-१८ या वर्षात अवैध खनन व वाहतुकीबाबतच्या कारवाईत एटापल्ली उपविभाग पिछाडीवर आहे. या उपविभागाने वर्षभरात केवळ २४ प्रकरणे निकाली काढून ३ लाख ४६ हजार ७०० इतका दंड संबंधित कंत्राटदाराकडून वसूल केला आहे. अहेरी उपविभागाने ७७ प्रकरणे निकाली काढून १२ लाख ३३ हजार २०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.

टॅग्स :sandवाळू