गडचिरोली जिल्ह्यात ७ लाख ४६ हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 19:21 IST2022-03-09T19:21:17+5:302022-03-09T19:21:54+5:30
Gadchiroli News छत्तीसगढ़ राज्यातून आरमोरी तालुक्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोन तस्करांना कूरखेडा पोलीसांनी गोठणगाव नाक्यावर काल रात्री ९.३० वाजेचा दरम्यान सापळा रचून अटक केली.

गडचिरोली जिल्ह्यात ७ लाख ४६ हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त
गडचिरोली- छत्तीसगढ़ राज्यातून आरमोरी तालुक्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोन तस्करांना कूरखेडा पोलीसांनी गोठणगाव नाक्यावर काल रात्री ९.३० वाजेचा दरम्यान सापळा रचून अटक केली.
दोन चार चाकी वाहनातून नेत असलेला सुमारे साडेसात लाखांचा सुगंधित तंबाखू व १९ लाखांचे वाहन असा २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला व दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोठणगाव नाक्यावरून मोठ्या प्रमाणात तंबाखूची वाहतूक होणार असल्याच्या माहितीवरून कुरखेडा पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. रात्री ९.३० च्या सुमारास ट्रक क्र. सी.जी. ०८ बी १७७३ व पीकअप कार क्र. एम.एच. ३३ टी २३७२ येताना दिसले. या वाहनांना थांबवून त्यांची झडती घेतली असता तंबाखूचा मोठा साठा त्यात आढळून आला.
आरोपी सलीम माखानी व साधू गावडे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.